ज्ञानेश्वर हिंगोलीकर -
पुणे: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांचे दिर आणि भाजपाचे शहर सरचिटणीस दीपक मिसाळ (Dipak Misal) यांना खंडणीसाठी अनोळखी नंबरवरून जिवे मारण्याची धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इमरान समीर शेख या इसमाने मिसाळ यांना खंडणीसाठी धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.
शहरातील (Pune) मोठ्या व्यावसायीकांसह आता राजकारणामधील व्यक्तींना देखील खंडणीसाठी धमकीचे फोन यायचे प्रकार समोर येत असतानाच पुणे भाजपचे शहर सरचिटणीस दीपक मिसाळ यांना देखील खंडणीसाठी फोन आला आहे.
पाहा व्हिडीओ -
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार मैदानाजवळ असणाऱ्या निवासस्थानी मिसाळ घरी असताना अनोळखी दोन नंबरवरून वारंवार व्हॉट्सॲप कॉल करून जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितली. धमकीचा फोन येताच दीपक मिसाळ यांनी खंडणी मागितल्या प्रकरणी पुण्यातील बिबेवाडी पोलिस स्थानकात (Bibewadi Police Station) विविध कलमाने गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.