Pune Auto Rickshaw Strike : रिक्षा संघटनांचा संप; आंदोलनाला हिंसक वळण, बाईक टॅक्सीचालकाला मारहाण

रिक्षा संघटनेच्या या संपाला हिंसक वळण लागलेलं पाहायाला मिळत आहे.
Pune Auto Rickshaw Drivers Strike
Pune Auto Rickshaw Drivers StrikeSaam tv

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Pune Auto Rickshaw Drivers Strike : पुण्यात रिक्षा संघटनांनी आज, सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. रिक्षा संघटनेच्या या संपाला हिंसक वळण लागलेलं पाहायाला मिळत आहे. पुण्यात संपात सहभागी न होणाऱ्यांच्या रिक्षा चालकांच्या रिक्षा फोडण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे बाईक टॅक्सीचालकाला रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण केल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. (Latest Marathi News)

Pune Auto Rickshaw Drivers Strike
Maharashtra Politics : शिंदे गटातील १६ आमदार पात्र की अपात्र? राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या 'सुप्रीम' सुनावणी

बघतोय रिक्षावाला संघटना आज, सोमवारी बाईक टॅक्सीच्या विरोधात परिवहन कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करत आहे. बाईक टॅक्सी बंद कराव्यात यासाठी वारंवार विनंती करूनही कारवाई होत नसल्याचं रिक्षाचालकांचं म्हणणं आहे. जवळपास ३००० रिक्षाचालक एकत्र आले आहेत. पुण्यातील १२ संघटनांचा या रिक्षा बंदला पाठींबा आहे.

रिक्षा चालकांच्या या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर बाईक टॅक्सीचालकाला रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरटीओ कार्यालयासमोर बाईक टॅक्सीचालकाला मारहाण करण्यात आली आहे. तर सिंहगड रोड रस्त्यावर रिक्षा बंद आंदोलनात सहभागी न झालेल्या रिक्षा अडवून काचा फोडण्यात आल्या आहेत.

रिक्षा चालकांचा बाईट टॅक्सीला विरोध

पुण्यात विविध भागात रिक्षाचालक एकत्र आलेत. रिक्षा एका उभ्या करून बाईट टॅक्सीला विरोध दर्शवला जात आहे. काही रिक्षाचालकांनी भीतीपोटी रिक्षा घराबाहेर न काढत संपात सहभाग नोंदवला आहे. या बंदमुळे विद्यार्थी, रुग्ण आणि पुणेकरांचे हाल होत आहेत.

Pune Auto Rickshaw Drivers Strike
Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पदमुक्त होण्याची चर्चा, राजभवनाकडून आली महत्त्वाची माहिती

काय आहे रिक्षा चालकांच्या संपाचं कारण?

ओला, उबेर आणि रॅपिडो कंपन्यांच्या बाईक टॅक्सीमुळे रिक्षावाल्याचा (Auto Rickshaw) ९० % व्यवसाय बुडत असल्याचा दावा रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ओला, उबेर आणि रॅपिडो कंपन्यांच्या बाईक टॅक्सीच्य विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. आम्ही ओला, उबेर आणि रॅपिडो कंपन्यांच्या बाईक टॅक्सी बंद झाल्याशिवाय संप व मागे घेणार नाही, असा इशारा बघतोय रिक्षावाला संघटनेने दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com