Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पदमुक्त होण्याची चर्चा, राजभवनाकडून आली महत्त्वाची माहिती

भगत सिंह कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याचे संकेत दिल्याची माहिती समोर येत होती.
Bhagat Singh Koshyari Latest News
Bhagat Singh Koshyari Latest News Saam TV

>> सुशांत सावंत

मुंबई : राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी गेल्या काळापासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आहेत. विरोधकांनी तर त्यांना हटवण्यासाठी आंदोलनं सुरु केली आहे. याचा पार्श्वभूमीवर राज्यपालांनी स्वत: पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. मात्र या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं राजभवनाकडून स्पष्टीकरण आलं आहे.

राज्यपाल यांच्याबाबत माध्यमांमध्ये येणारी बातमी चुकीची असल्याचे स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आले आहे.  (Latest Marathi News)

Bhagat Singh Koshyari Latest News
Maharashtra Politics : शिंदे गटातील १६ आमदार पात्र की अपात्र? राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या 'सुप्रीम' सुनावणी

राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यातील वातावरण तापलं आहे. यावरुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत होती. राज्यपालांना हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरु आहेत.

Bhagat Singh Koshyari Latest News
Ajit Pawar : राज्यपाल कोश्यारींवर कारवाई व्हायला पाहिजे का? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. दरम्यान शिंदे गटानेही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांनीही राज्यपालांविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com