PUBG च्या नादात आईच्या खात्यातून उडवले 10 लाख रुपये; मुंबईतील घटना

मुंबई मधील जोगेश्वरी भागातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. PUBG च्या व्यसनामुळे येथील 16 वर्षांच्या मुलाने त्याच्या पालकांच्या खात्यातून 10 लाख रुपये काढले आहेत.
PUBG च्या नादात आईच्या खात्यातून उडवले 10 लाख रुपये; मुंबईतील घटना
PUBG च्या नादात आईच्या खात्यातून उडवले 10 लाख रुपये; मुंबईतील घटनाSaam Tv
Published On

मुंबई : मुंबई Mumbai मधील जोगेश्वरी Jogeshwari भागातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. PUBG च्या व्यसनामुळे येथील 16 वर्षांच्या मुलाने प्रथम त्याच्या पालकांच्या खात्यातून 10 लाख रुपये काढले आहेत. नंतर, जेव्हा पालकांनी त्याला या घटनेसाठी ओरडा दिला, तेव्हा त्याने चक्क घरच सोडले. एवढेच नाही तर त्याने त्याच्या मागे एक चिठ्ठीही सोडली. जेव्हा पालकांनी पत्र वाचले तेव्हा त्यांना धक्काच बसला, आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

हे देखील पहा-

नेमके प्रकरण काय?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी परिसरातील 16 वर्षांच्या मुलाने PUBG खेळण्यासाठी ऑनलाइन बँक Online Bank Account व्यवहारातून 10 लाख रुपये खर्च केले आहेत. नंतर, जेव्हा पालकांनी या घटनेसाठी मुलाला फटकारले, तेव्हा तो त्याच्या घरातून पळून गेला. अशी माहिती मुंबई पोलिसांनी काल शुक्रवारी दिली.

पोलिसांनी गुरुवारी दुपारी अंधेरी (पूर्व) येथील महाकाली लेणी परिसरात पळून गेलेल्या मुलाचा शोध घेतला आणि त्याला त्याच्या पालकांकडे पाठवले आहे.

PUBG च्या नादात आईच्या खात्यातून उडवले 10 लाख रुपये; मुंबईतील घटना
Satara: बालसुधारगृहात अल्पवयीन संशयित आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या!

तपासादरम्यान, मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा मुलाला गेल्या महिन्यापासून PUBG चे व्यसन लागले होते. त्यामुळे त्याने मोबाईल फोनवर तो गेम खेळत असताना त्याच्या आईच्या बँक खात्यातून दहा लाख रुपये खर्च केले.

पोलिसांनी सांगितले की, जेव्हा पालकांना ऑनलाईन व्यवहाराची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्याला फटकारले त्यानंतर त्याने पत्र लिहून घर सोडले. पत्रात लिहिले होते की तो कायमचा घर सोडत आहे आणि तो पुन्हा कधीही परत येणार नाही.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com