डोंबिवली : डोंबिवलीतील कोपर पुलाचे काम मागील दीड वर्षापासून सुरू आहे. हे काम १५ जुलै २०२१ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली होती. मात्र, आता पुलावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू असून त्यानंतर डांबरीकरणाचे काम देखील शिल्लक आहे. पावसामुळे या कामाला आणखी एक ते दीड महिना लागेल. त्यामुळे १५ जुलैचा मुहूर्त हुकला आहे. तर ऑगस्ट महिन्याअखेर पुलाचे काम होऊ शकते असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. Procrastination In Inauguration of Kopar bridge in Dombivli
हे देखील पहा -
यापूर्वी सुद्धा सत्ताधारी आणि प्रशासनाकडून पूल चालू करण्याच्या वेगवेगळ्या तारखा दिल्या गेल्या आहेत. मात्र, सतत राखडणाऱ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामुळे 'तारीख पे तारीख' चा खेळ चालू आहे का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. यापूर्वीही पत्रिपुलाच्या वेगवेगळ्या तारखा दिल्या होत्या. तसाच प्रकार आता कोपर पूलाबाबत चालू असल्याचे डोंबिवली मधील नागरिकांचे म्हणणे आहे. आता महापालिकेने नवीन तारीख दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर टीका केली आहे.
याबाबत मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीका करताना म्हटले आहे की, प्रशासन तारखेवर वर तारीख देत आहे. यामुळे डोंबिवलीकरांना याचा प्रचंड त्रास होत आहे. या रखडलेल्या पुलाच्या कामामुळे दोन वर्षांपासून नागरिकांचे हाल होत आहेत. ठाकुर्लीचा पूल हा कसा नसावा याचे उत्तम उदाहरण आहे. चायनाने सहा वर्षात साडेचारशे किलोमीटरचा पूल बांधला व आपल्याला दोन वर्षात ५० मीटरचा पूल बांधता येत नाही हे आपलं दुर्दैव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना मनोज घरत म्हणाले की, हे फक्त टक्केवारीचे राजकारण आहे. पैशाचा मलिदा कसा खाता येईल याकडे सत्ताधाऱ्यांच लक्ष असल्याची टीका त्यांनी सत्ताधारी शिवसेनेवर केली आहे. तर यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी खोचक टोला हाणत सांगितले की महापालिकेकडून नुसत्या तारखा सांगतात, पण साल सांगायला महापालिका विसरत आहे. अश्याने लवकरच काम होईल असे पाटील यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.