PM Modi Pune Visit: मणिपूर प्रकरणामुळे PM मोदींच्या पुणे दौऱ्याला महाविकास आघाडीचा विरोध; 'इंडिया'चे सगळे पक्ष करणार आंदोलन

Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे (Pune) दौऱ्याला महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) विरोध दर्शवला आहे.
PM Modi Pune Visit
PM Modi Pune VisitTwitter/ ANI

Pune News: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा निश्चित करण्यात आला आहे. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याला महाविकास आघाडीने विरोध केला आहे. (Latest Marathi News)

PM Modi Pune Visit
Dombivli Crime: इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात! अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावले अन्... धक्कादायक प्रकाराने खळबळ

याबाबत अधिक माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुणे (Pune) दौऱ्याला महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) विरोध दर्शवला आहे. मोदींनी मणिपूरमध्ये (Manipur Violence) जाऊन परिस्थिती पाहावी आणि चर्चा करावी या मागणीसाठी आम्ही हा विरोध करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

या दौऱ्याला आंदोलन करुन महाविकास आघाडीकडून विरोध केला जाणार असून इंडिया आघाडीमधील सगळे पक्ष मोदींविरोधात एकत्र येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याआधी कॉंग्रेसकडून नरेंद्र मोदींना हा पुरस्कार देण्यावरुनही विरोध दर्शवला आहे.

PM Modi Pune Visit
Ahmednagar Politics: कर्जत-जामखेड एमआयडीसीची जमीन नीरव मोदीच्या नावावर? भाजप आमदाराचा गंभीर आरोप

असा असेल दौरा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रम आणि विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच यावेळी पंतप्रधान मोदी हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ‘श्रीं’च्या मूर्तीला अभिषेक करणार आहेत. त्यानंतर लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com