'फळं येणाऱ्या झाडालाच लोकं दगड मारतात, आरोपांना घाबरत नाही; मजूर प्रकरणावर दरेकरांचे स्पष्टीकरण

सहकार मंत्र्यांनी आणि CMO मधून कॉल करून माझ्यावर कारवाई करायला लावली असा आरोपही दरेकरांनी केला आहे.
Pravin Darekar
Pravin DarekarSaam TV
Published On

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मजूर म्हणून मुंबई बँकेचा (Mumbai Bank) अर्ज भरल्या प्रकरणी त्यांच्यावरती करण्यात आलेल्या कारवाईबाबत आज विधान परिषदेत स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, 'बँका लुटायच्या तुम्ही आणि गुन्हा आमच्यावर दाखल करायचा' असा आक्रमाक पवित्रा घेत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची नावं मजूर म्हणून असल्याचा दाखला दिला त्या नेत्यांची नावे देखील दरेकरांनी (Pravin Darekar) वाचून दाखवली आणि यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित केला.

ते म्हणाले, प्रसंग माझ्या कारवाईचा नाही, मुंबईतील अनेक बेरोजगारांना मी रोजगार दिला आहे. प्रवीण दरेकरवर कारवाई दिली कारवाई फक्त दरेकरांवर आहे असं सांगावं तरी चालेल, २२,३०० रुपयांचा भत्ता घेतला म्हणून माझ्यावर आरोप केला आहे. भत्ता घेतला म्हणून मोठा दरोडेखोर प्रवीण दरेकर, असुद्या माझ्यावर आरोप करताय ना करा कारण, फळे येणाऱ्या झाडालाच लोकं दगड मारत असतात. मी या आरोपांना घाबरत नाही असं ते म्हणाले.

कारवाईसाठी सीएमओमधून कॉल -

Pravin Darekar
'शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर, बारणे काय म्हणतायत ते बघा; पक्ष वाढीचं सोडा आहे तो टिकवा'

तसंच, सहकार मंत्र्यांनी आणि सीएमओ मधून कॉल करून माझ्यावर कारवाई करायला लावली असा आरोपही त्यांनी केला. विरोधी पक्षाच्या नेत्यांना चिरडून टाकायचं प्रयत्न सुरु आहे. 15 हजार मजूर संस्था आहेत तुम्ही किती लोकांवर कारवाई करणार? असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला.

मी सहकार मध्ये काम करणारा कार्यकर्ता सहकार उध्वस्त व्हावी अशी माझी भावना नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना भेटून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या प्रमाणे माझ्याबाबत षडयंत्र रचले जात असल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत त्यांना दाखविणार, आमचा गुन्हा रेकॉर्ड वर आणता तसा मेहबूब शेख आणि रघुनाथ कुचिक (Mehboob Sheikh and Raghunath Kuchik) यांच्यावरील गुन्ह्यांची नावे सभागृहात वाचून दाखवा अस आव्हानच त्यांनी सरकारला दिलं. तसंच मी सीबीआयकडे (CBI) तक्रार करणार आहे. सहकार चळवळीवर दरोडे यांनी टाकायचे आणि माझ्यावर आरोप करायचे की मी 25 हजार भत्ता घेतला मला दरोडेखोर म्हणता असं दरेकर म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com