प्रफुल्ल पटेल ईडीच्या कार्यालयात जाण्याचे कारण काय?

ईडीने प्रफुल्ल पटेलांची मालमत्ता का जप्त केली, वाचा सविस्तर
प्रफुल्ल पटेल ईडीच्या कार्यालयात जाण्याचे कारण काय?
प्रफुल्ल पटेल ईडीच्या कार्यालयात जाण्याचे कारण काय?
Published On

सुरज सावंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांची काही मालमत्ता अंमलबजावणी संचलनालयाने (Directorate of Enforcement) जप्त केली आहे. या प्रकरणी आज आज (23 ऑगस्ट) दुपारी ते अंमलबजावणी संचलनालय कार्यालयाकडे (ED) कार्यालयात गेले होते. पण ते कार्यालयात फार वेळ न थांबता स्वाक्षरी करुन परत निघाले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

हे देखील पहा-

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्चीच्या पत्नीसोबत कलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावले होते. वरळीमधील नेहरू तारांगणच्या समोर असलेल्या पटेल यांच्या मालकीच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इक्बाल मेमन याला एक प्लॉट देण्यात आला होता. या ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने सीजे हाऊस या नावाने १५ मजली इमारत उभारली.

दरम्यान, इक्बाल मिर्चीची मालमत्ता म्हणजेच सीजे हाऊस इमारतीचा तिसरा आणि चौथा मजलाईडीने जप्त केला आहे. याच प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने ईडीने चौकशीसाठी प्रफुल्ल पटेल यांना ईडीने बोलावल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com