Potholes At Lonavala Kamshet Road: पर्यटक त्रस्त, पीडब्ल्यूडी सुस्त; लोणावळा- कामशेत रस्त्यावर खड्डेच खड्डे चोहीकडे

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे छाेटे माेठे अपघात हाेत आहेत.
potholes at lonavala kamshet road
potholes at lonavala kamshet roadsaam tv

Maval News : पवनमावळ येथे तुंग तिकोना, लोहगड, विसापूर, पवना धरण तसेच लोणावळा भुशी धरण ही मुख्य पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी लोणावळा ते कामशेत या मुख्य रस्त्याचा पर्यटक मोठ्या प्रमाणत करतात. या रस्त्याची चाळण झाल्याने पर्यटक त्रस्त झाले आहेत. (Maharashtra News)

potholes at lonavala kamshet road
Kalyan- Shil Road : आजपासून पाच दिवसांसाठी कल्याण- शिळ महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल; जाणून घ्या कारण

या रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी देखील सातत्याने होत असते. परिणामी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. संबंधित खात्याच्या बेफिकीरपणामुळे स्थानिकांसह पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

potholes at lonavala kamshet road
Kothimbir Price Drop In Maharashtra: कोथिंबीर झाली उदंड, शेतक-यांना आर्थिक भुर्दंड; फिरवू लागलेत रोटाव्हेटर

संबंधित खात्याकडून तेथे तात्पुरता भराव केला जातो. परंतु पर्यटननगरी लोणावळा ते पवनानगरकडे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्या पुन्हा खचतात. येथे खड्डे (potholes) पडततात. त्यामुळे येथे तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कायमचा रस्ता करावी अशी मागणी रस्त्याने ये-जा करणारे शालेय विद्यार्थी, शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

potholes at lonavala kamshet road
Nashik Crime News : रात्रीस खेळ चाले... १ कोटी ४० लाखांचा चाेरीच्या तपासाचे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेपुढं आव्हान

या ठिकाणी पडलेले खड्डे मोठे असल्याने दुचाकी चालक घसरून पडल्याचे प्रकार होत आहेत. तसेच खड्ड्यांमध्ये देखील वाहने आदळत असल्याने वाहनांचेही नुकसान होत आहे. या वाहतूक कोंडीमध्ये नागरिकांचे (citizens) वारंवार किरकोळ वाद होताहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ते नीट करण्याची मागणी केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com