Shivaji Maharaj Statue: मालवण येथील शिवरायांच्या पुतळ्याबाबत निर्णय झाला; पण 'या' अश्वारूढ पुतळ्याचं काय? VIDEO

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Dadar: छत्रपती शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा अनेक वर्षांपासून आहे. या पुतळ्याची देखरेख व्यवस्थित होत नसल्याचा आरोप स्थानीक नागरिकांनी केला आहे.
 Shivaji Maharaj Statue: मालवण येथील शिवरायांच्या पुतळ्याबाबत निर्णय झाला; पण 'या' अश्वारूढ पुतळ्याचं काय?
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Dadar: Saamtv
Published On

वैदेही काणेकर, साम टीव्ही | मुंबई प्रतिनिधी

सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर शिवप्रेमी तसेच राजकीय नेत्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्याठिकाणी नवीन पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. अशातच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील महाराजांच्या पुतळ्याच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शिवरायांच्या पुतळ्याची दुरावस्था!

मालवण येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेनंतर आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील महाराजांच्या पुतळ्याच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. छत्रपती शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा अनेक वर्षांपासून आहे. या पुतळ्याची देखरेख व्यवस्थित होत नसल्याचा आरोप स्थानीक नागरिकांनी केला आहे. पुतळ्याच्या चाबुतऱ्यावर दीड ते दोन फुटाची पिंपळाची झाडं उगवली आहेत.

नागरिकांनी उचलला मुद्दा..

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा रंगही फिकट झाला आहे. राजेंच्या स्मारकाजवळील लाईटसुद्धा अनेकवेळा बंद असतात. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा याबाबत महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र याबाबतसुद्धा शासन दरबारी अनास्था पाहायला मिळत आहे. आमचे काम नाही असे म्हणत प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचे उत्तर या नागरिकांनी दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शिवप्रेमींकडून होत आहे.

 Shivaji Maharaj Statue: मालवण येथील शिवरायांच्या पुतळ्याबाबत निर्णय झाला; पण 'या' अश्वारूढ पुतळ्याचं काय?
Kolhapur Accident News: भीषण, तितकाच भयंकर अपघात! सुसाट कारची धडक, तरूण हवेत चेंडूसारखा उडाला, थरारक VIDEO

दरम्यान, सिंधुर्गमध्ये घडलेल्या घटनेनंतर आज प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी राजकोट किल्ल्याची पाहणी केली. राम सुतार यांचा हा पाहणी दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. राम सुतार राजकोट किल्ल्याची पाहणी करत असतानासुद्धा त्यांच्यासोबत मोजकेच अधिकारी होते. राम सुतार राजकोट किल्ल्याची आणि दुर्घटना झालेल्या पुतळ्याची पाहणी करून मुंबईत परतले असून ते आता राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहेत.

दुसरीकडे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट चेतन पाटीलची बाजू मांडण्यासाठी कोल्हापूर मधून वकिलांची फौज मालवणात दाखल झाली आहे. ॲड. तुषार शिंदे, ॲड. सोनावले, ॲड अभिजीत हिरुगडे, कोमलराव राणे ॲड सुरेश तेली हे आरोपीचे वकीलपत्र घेऊन दाखल झाले आहेत. आज आरोपीला दुपारच्या सत्रात मालवण न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com