VIDEO: 'राजकीय वारसा केवळ रक्ताने येत नाही', मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray: राजकीय वारसा केवळ रक्ताने येत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
'राजकीय वारसा केवळ रक्ताने येत नाही', मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं
CM Eknath Shinde On Uddhav ThackeraySaam Tv

आज महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहीत उद्धव ठाकरे यांना डिवचलंय. राजकीय वारसा हा केवळ रक्ताने नाही, तर कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो, असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय.

लोकसभा निवडणुकीत जनतेचा आम्हाला पाठिंबा मिळाला त्यामुळे खरी शिवसेना कुणाची याचा वादही मिटलाय, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय.

'राजकीय वारसा केवळ रक्ताने येत नाही', मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं
Senior Citizens Schemes : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत मोठी घोषणा; ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ, VIDEO

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

फेसबुकवर पोस्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दोन वर्षांपूर्वी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. जनतेची साथ, विश्वास हेच माझे संचित आहे. तुमच्या प्रेमाच्या, आशीर्वादाच्या बळावर आणि सहकाऱ्यांच्या विश्वासावरच मी राज्याचे नेतृत्व करत आहे.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वैचारिक दगाबाजी करीत, ज्यांनी असंगाशी संग केला होता, त्यांची साथ सोडून आम्ही जनतेच्या मनातले सरकार स्थापन केले, त्याला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत.''

ते म्हणाले की, ''महायुती सरकारने राबवलेल्या काही उपक्रमांकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आणि इतर राज्यांकडून या योजनांचा तपशील मागवला गेला. त्यात सर्वाधिक चर्चा झाली ती ‘शासन आपल्या दारी’ या कल्पक योजनेची. योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत नेण्याचे आमचे हे व्रत होते. सामान्य माणसांचे कष्ट आणि धावपळ वाचवण्यासाठी महायुतीने थेट सरकारलाच लोकांच्या दारापर्यंत नेले.''

'राजकीय वारसा केवळ रक्ताने येत नाही', मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं
Uttarakhand Video: उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार! सुखी नदीला पूर, शेकडो वाहनं पाण्यात; पाहा व्हिडिओ

उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे या पोस्टमध्ये म्हणाले की, दोन वर्षांतील विकासाचा आणि विश्वासाचा आलेख जनतेसमोर आहेत. तो या व्यासपीठावर मांडण्यासाठी जागा कमी पडेल. परंतु, शिवसेनेच्या भगव्याचे, बाळासाहेबांच्या विचारांचे पावित्र्य राखण्याचे शिवधनुष्य आम्ही यशस्वीरित्या पेलले आहे, याचा सर्वाधिक अभिमान आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा बाळासाहेबांचा मंत्र जपत लोकहिताचा ध्यास घेतला, याचे समाधान आहे. राजकीय वारसा हा केवळ रक्ताने नाही तर कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो, हे मी आणि शिवसेनेच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत दाखवून दिले.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com