वर्दीतल्या संगीतकाराची बासरी ऐकून मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही (पाहा Video)

Mumbai Police Flute Viral Video : एका यूजरनं म्हटलंय कि, "आमचे मुंबई पोलीस खरचं कलाकार आहेत, त्यांचा आहे आम्हाला अभिमान आहे."
police sub-inspector from Mumbai is playing sandese aate hai song on flute video goes viral
police sub-inspector from Mumbai is playing sandese aate hai song on flute video goes viralTwitter/@WadalaForum
Published On

मुंबई: संगीत आपल्या कानांनाच नाही तर मनालाही तृप्तं करतं. व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातली असो, संगीत (Music) ऐकायला प्रत्येकालाच आवडतं. पण, संगीताची कला वाटते तेवढी सोपी नसते. मग ते प्रत्यक्षात गाणं असो किंवा एखादं वाद्य वाजवणं असो. प्रत्येकाला ते जमत नाही. मात्र मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं आपली ड्यूटी निभावतानाच आपली कलाही (Art) जोपासलेली आहे. हे पोलीस उप-निरीक्षक उत्तम बासरी (Flute) वाजवतात. 'संदेसे आते है' या सुप्रसिद्ध गाण्यावर त्यांनी बासरी वाजवल्याच्या व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. (police sub-inspector from Mumbai is playing sandese aate hai song on flute video goes viral)

हे देखील पाहा -

ट्विटरवर (Twitter) एका युजरने हा व्हिडिओ (Viral Video) शेयर केला आहे. २ मिनिटे २० सेकंदांच्या या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून शेकडो लाईक्स आणि रिट्वीट मिळत आहेत. या पोलीस अधिकाऱ्याचं लोक कौतुक करत आहेत. आपली ड्यूटी सांभाळत बासरीवादनाची कला जोपासल्याबद्दल या पोलीस अधिकाऱ्याचं नेटीझन्स अभिनंदन करतायत. एका यूजरनं म्हटलंय कि, "आमचे मुंबई पोलीस खरचं कलाकार आहेत, त्यांचा आहे आम्हाला अभिमान आहे" तर दुसऱ्या आणखीन एका यूजरने लिहीलं की, "खूप सुंदर आम्हाला अभिमान आहे आमच्या मुंबई पोलीस दलाचा" अशा शेकडो कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

police sub-inspector from Mumbai is playing sandese aate hai song on flute video goes viral
अजिंठा लेणीजवळ आहे आणखी एक लेणी..जी होतेय नामशेष

मुंबई पोलीस दलात आणि एकूणच महाराष्ट्र पोलीस दलात अनेक असे पोलीस अधिकारी, कॉन्स्टेबल आहेत जे यापूर्वीही त्यांच्या कलेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. संघपाल तायडे हे जळगावचे पोलीस हवालदार अशाच एका व्हायरल व्हिडिओमुळे रातोरात स्टार झाले. त्यांच्या सुरेल गायकीमुळे त्यांनी अनेक शोमध्ये राष्ट्रीय टेलिव्हीजनवर आपल्या आवाजाची जादू पसरवली. १२ तासांपेक्षा जास्तवेळ ड्यूटी करुन, सर्व जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडणारे पोलीस आपल्यातील कलेने अनेकांची मनंही जिंकतात. यामुळेच वर्दीतल्या या माणसाला, वर्दीतल्या या संगीतकाराला लोकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com