पुणे पोलीस दलातील भरती परीक्षा सुरू, केंद्रांवर बंदोबस्त

पुणे पोलिस आयुक्तलय अंतर्गत होणाऱ्या पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेकरिता मंगळवारी बहुतांश उमेदवारानी सकाळी 10 वाजण्याअगोदरच हजेरी लावली
पुणे पोलीस दलातील भरती परीक्षा सुरू, केंद्रांवर बंदोबस्त
पुणे पोलीस दलातील भरती परीक्षा सुरू, केंद्रांवर बंदोबस्तSaam Tv
Published On

पुणे : पुणे पोलिस आयुक्तलय अंतर्गत होणाऱ्या पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेकरिता मंगळवारी बहुतांश उमेदवारानी सकाळी 10 वाजण्याअगोदरच हजेरी लावली आहे. केंद्रावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या नियमांचे पालन करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी केंद्रावर हजर होते. शहरातील ७९ केंद्रावर लेखी परीक्षा होत असून त्याकरिता ३९ हजार ३२३ अर्ज दाखल करण्यात आली आहेत.

हे देखील पहा-

पोलिसांकडून सोमवारी रात्रीपर्यंत परिक्षेची पुर्ण तयारी करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आणि गैरप्रकार टाळण्याकरिता केंद्रावर पोलिस बंदोबस्त, व्हिडीओ चित्रीकरण आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भरारी पथके नेमण्यात आली आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून लेखी परिक्षेकरिता उमेदवार सोमवारी रात्री शहरात दाखल झाले होते. स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर या ठिकाणी रात्री मुक्काम करुन उमेदवारांनी सकाळी लवकरच परीक्षा केंद्र शोधण्यास सुरुवात केली आहे.

पुणे पोलीस दलातील भरती परीक्षा सुरू, केंद्रांवर बंदोबस्त
अतिवृष्टीमुळे बेलदरीत 40 जनावरे गेली वाहून... (पहा व्हिडिओ)

केंद्राच्या परिसरातच नाष्टा केल्यानंतर उमेदवारानी साडेनऊ वाजल्यापासून केंद्रावर हजेरी लावण्यास सुरुवात झाली आहे. केंद्राच्या ठिकाणी उमेदवारची पोलिस कर्मचारी यांच्यकडुन व्यवस्थित तपासणी करुन हातावर सॅनिटायझर देऊन बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. एका बेंचवर एक उमेदवार अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थिती लावली होती. केंद्राची पाहणी केल्यानंतर उमेदवाराना प्रवेश देण्यात आला आहे. सकाळी १०.३० वाजेपर्यंत बहुतांश उमेदवार परीक्षा केंद्रावर हजर झाले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com