प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांची नोटीस

उद्या सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे.
Pravin Darekar News
Pravin Darekar NewsSaam Tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई - विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबै बँक मजूर प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. प्रवीण दरेकर यांना उद्या (4 एप्रिल) मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस (Police) ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना उद्या सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

आम आदमी पार्टीच्या वतीने प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. दरेकर यांच्यावर मजूर नसताना देखील याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

हे देखील पहा -

काय आहे प्रकरण?

मुंबै बँकेवर संचालक म्हणून प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड झाली होती. प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं. मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केली असा आरोप आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी केला आहे. मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला आहे. तसेच सहकार कायद्याचे देखील उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com