प्रदीप भणगे
डोंबिवली : उच्च शिक्षित, विधवा व घटस्फोटित महिलांना women हनी ट्रॅप मध्ये अडकवणाऱ्या भामट्याला मुंबई Mumbai येथील विष्णूनगर पोलिसांनी Police अटक केली आहे. शैलेश बांबार्डेकर ऊर्फ प्रथम माने (वय- ३५) असे अटक आरोपीचे नाव आहे. Police arrest accused dragging women into nets
डोंबिवली Dombivli पश्चिमेतील विष्णूनगर पोलिस ठाण्यात १६ एप्रिलला एका पीडित महिलेने मेट्रोमोनियल साईटवरून Metromonial site एकाने तिची फसवणूक Cheating करून, १० तोळे सोने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साबळे, पोलिस निरीक्षक आर.खिल्लारे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे यांच्या पथकाने तपास सुरू केला आहे.
हे देखील पहा-
गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून पोलिसांनी Police शैलेश याला कांदिवली Kandivali येथून सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडे तपासात १४० ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अशाप्रकारे अजून ३ महिलांची त्याने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. विरार Virar येथील राहत असणाऱ्या शैलेशने एका प्रसिद्ध मेट्रोमोनियल संकेतस्थळावर प्रथम माने या नावाने खाते उघडले होते. Police arrest accused dragging women into nets
याठिकाणी त्याने उच्चशिक्षित असल्याची माहिती त्याने दिली होती. त्याआधारावर उच्च शिक्षित आणि खासकरून घटस्फोटित व विधवा महिलांशी ओळख करून तो त्यांना लग्नाचे प्रलोभन, आणि नंतर भावनिक जवळीक साधून, तो पैशांसह सोन्याचे दागिने घेऊन पसार होत असत. परंतु, या वेळेस त्याचा हा प्रयत्न फसला आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.