Narendra Modi : PM नरेंद्र मोदी पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार; मुस्लिम समाजाच्या 'या' कार्यक्रमाला उपस्थित राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
narendra modi
narendra modi Saam Tv

संजय गडदे

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईच्या अंधेरी मरोळ येथील बोरी समाजाच्या १० फेब्रुवारीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेकडून तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुन्हा एकदा सूरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

narendra modi
Sharad Pawar : शरद पवारांकडून भर बैठकीत नाराजी व्यक्त, नेमकं काय आहे कारण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईचा अंधेरी पूर्वेत मरोळ बोरी कॉलनीमध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून अली जामिया तुस सैफिया विद्यापीठ उभारण्यात आले आहे. या विद्यापीठाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येणार आहे. अंधेरी पूर्वेत मरोळ भागामध्ये बोरी कॉलनी परिसर आहे. या परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेकडून तयारीचा आढावा घेण्यात आला. आज सकाळपासून पोलीस उपायुक्त परिमंडळ दहाच्या डीसीपी महेश्वर रेड्डी आणि स्थानिक मुंबई महानगरपालिका के/ईस्ट वॉर्ड चे ऑफिसर मनीष वळुंजू हे देखील पंतप्रधान यांचा कार्यक्रमाचे ठिकाणचा आढावा घेण्यात आला आहे.

narendra modi
Eknath Shinde : राज्यातील खासदारांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक; CM शिंदेंनी बैठकीत केले 'हे' आवाहन

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. मोदी यांनी या दौऱ्यात मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासह अनेक विकासकामांची पायाभरणी केली. एकूण 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. मुंबई महापालिकेने १ हजार ७५० कोटी रुपये खर्चून मुंबईचे सौंदर्यीकरण अशा विविध ५०० हून अधिक काम पूर्ण केले. त्या कामाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com