Kalyan News : डोंबिवलीकरांनो ! आज पाणीपुरवठ्यावर होणार मोठा परिणाम; जाणून घ्या कारण (पाहा व्हिडिओ)

रेल्वे पोलीस ठाण्यात देखील पाणी शिरले होते.
kalyan water supply
kalyan water supplySaam TV
Published On

- अभिजित देशमुख

Kalyan News : स्मार्ट सिटी अंतर्गत पुलाचा पाया खणत असताना पोकलनचा फटका लागल्याने कल्याण पालिकेची पाणी पूरवठ्याची जलवाहिनी फुटली. यामुळे तिसऱ्या मजल्यापर्यंत पाण्याचा फवारा उडाला. या घटनेनंतर लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. (Maharashtra News)

kalyan water supply
Grampanchayat Election News : ३५ वर्षांत जे क-हाडात घडलं नाही ते डॉ. अतुल भोसलेंनी घडवून आणलं, पृथ्वीराज चव्हाण गटास माेठा धक्का

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेचं पूल उभारणीचं काम सुरू आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास रस्ता खोदत असताना पोकलनचा जलवाहिनीला फटका लागला. परिणामी जलवाहिनी फुटली.

सुमारे दीड ते दोन फूट व्यास असलेली ही जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की जवळपास तिसऱ्या मजल्या पर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. सुमारे दीड ते दोन तास पाण्याचे फवारे उडत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

kalyan water supply
Grampanchayat Election News : नाद खूळा! 35 वर्षानंतर खासदार धनंजय महाडिक कुटुंबात सरपंचपदाची माळ

त्यामुळे स्टेशन परिसर जलमय झाला होता. रेल्वे स्टेशन परिसरातील पाण्याच्या प्रवाहामुळे पार्किंग मधील बाईकचे देखील नुकसान झाले. त्याचप्रमाणे रेल्वे पोलीस ठाण्यात देखील पाणी शिरले होते.

या घटनेमुळे स्टेशन परिसरात घरी परतणाऱ्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी या पाईपलाईन वरील पाणीपुरवठा बंद करण्याचे काम सुरू असल्याचे साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

सुमारे दोन तासानंतर हा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले मात्र याचा फटका डोंबिवलीला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

kalyan water supply
Jat News : दुष्काळ जाहीर करा... जत तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले, शुक्रवारी लाक्षणिक उपोषण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com