शादी डॉट कॉमवर ओळख; नंतर लग्नाचे आमिष दाखवत...; पिंपरी चिंचवडमधील महिलेसोबत नको ते घडलं, तिघांना अटक

Pimpri Chinchwad News : मॅट्रिमोनिअल प्लॅटफॉर्मवर ओळख करुन महिलेची जवळपास ३ कोटी १७ लाख रुपयांची फसवणूकीचा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिल्लीहून तिघांना ताब्यात घेतले आहे.
Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad Newsx
Published On

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

शादी डॉट कॉम या वेबसाईटवरुन महिलेशी ओळख करुन तिची जवळपास ३ कोटी १७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवड शहर सायबर पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करत या प्रकरणातील तीन आरोपींना दिल्ली येथून बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी शादी डॉट कॉमवरुन पीडित महिलेशी ओळख केली. त्यानंतर आरोपींनी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले, तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्यवसायात तोटा झाल्याचे कारण देत महिलेकडून पैसे घेतले. कधी कच्चामाल घेण्यासाठी भांडवल, तर कधी विमानतळावर अधिकाऱ्यांनी पकडल्याचे सांगत पीडितेला फसवले.

Pimpri Chinchwad News
Accident News : लग्न सोहळ्याहून परतताना काळाने घात केला, भीषण अपघातात नवविवाहित वधूवरासह ५ जणांचा अंत

आरोपींनी पीडीत महिलेकडून जवळपास ३ कोटी १६ लाख ७८ हजार रुपये उकळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलेकडून पैसे मिळवल्यानंतर आरोपींनी ते पैसे वेगवेगळ्या बँकांच्या ३०० ते ४०० बँक खात्यांमध्ये वळवले. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर विभागातील अधिकाऱ्यांनी शिताफीने या गुन्ह्यातील आरोपींना पकडले.

Pimpri Chinchwad News
Beed Crime : लग्नानंतर १० महिन्यातच भांडणाला कंटाळला, वेगळं राहायला गेला म्हणून बायकोची सटकली, माहेरच्यांना बोलावलं अन्...

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, महिलेला ३ कोटी १७ लाख रुपयांचा गंडा घाळणे या प्रकरणी पोलिसांनी रंजीत मुन्नालाल यादव (वय २७ वर्ष), सिकंदर मुन्ना खान (वय २१ वर्ष) आणि बबलू रघुवीर यादव (वय २५ वर्ष) यांना दिल्ली येथून बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणामुळे पिंपरी चिंचवडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Pimpri Chinchwad News
Pune News : पवना डॅम, कार्ला लेणी, एकविरा देवी, लोहगडसह पर्यटनस्थळांवर पावसाळ्यात बंदी, कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com