Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी! 12 वर्षांपासून रखडलेली योजना होणार सुरू...

Pavana Pipeline Project: पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी! 12 वर्षांपासून रखडलेली योजना होणार सुरू...
Pavana Pipeline Project
Pavana Pipeline ProjectSaam Tv

Pavana Pipeline Project:

पिंपरी- चिंचवडकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला, मात्र मावळ गोळीबार प्रकरणाने वादग्रस्त ठरल्याने मागील 12 वर्षांपासून स्थिगीत ठेवण्यात आलेल्या पवना जलवाहिनी प्रकल्पवरील स्थगिती राज्य सरकारने मागे घेतली आहे. तसेच राज्य शासनाने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना पत्र देऊन पवना बंदिस्त जल वाहिंनीचे काम पुन्हा सुरू करण्यास आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहराला पवाना धरणातून पाण्याचा पाणी पुरवठा केला जातो. मात्र नदिपात्रातून येणारे पाणी प्रदूषित असल्याने पाण्याच्या पुरवठा बंद पाईप लाईनद्वारे करण्याचा निर्णय घेत, तशी योजना देखिल आखण्यात आली होती. 2011 साली पवना बंद पाईपलाईन प्रकल्प उभारणीला प्रत्यक्ष सुरवात देखील झाली होती.

Pavana Pipeline Project
PF News: 72 तासांत तुमच्या बँक खात्यात येऊ शकतात पीएफचे पैसे, जाणून घ्या कसे...

मात्र मावळ मधील शेतकऱ्यांनी बंद पाईपलाईन योजनेला तीव्र विरोध केला होता. त्यातून झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला आणि त्यामध्ये तीन शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला होता. शेतकऱ्यांच्या भावना अधिक तीव्र होत असल्याचं पाहून तत्कालीन सरकारने पवना बंद जल वाहिनी प्रकल्प स्थगित ठेवण्याचे आदेश दिले होते.  (Latest Marathi News)

त्यानुसार मागील 12 वर्षांपासून ही योजना रखडली होती. प्रकल्प उभारणीसाठी उभारलेला सुमारे 200 कोटींचा खर्च देखील पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झालेली होती. त्यातच दूषित पाणी पुरवठा होत असल्याने पिंपरी शहरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाल्याची बाब भाजप आमदार महेश लांडगे यांनी अधिवेशन काळात राज्य सरकारच्या लक्षात आणून दिली.

Pavana Pipeline Project
Nana Patole News : मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा मोदी सरकारचा प्लान, नाना पटोले यांचा मोठा दावा

या प्रश्नाचा सतत पाठ पुरावा केला होता. त्यांनतर आता प्रकलपावरील स्थगिती उठविण्यात आल्यामुळे पिंपरी चिंचवड करांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, बंद पाईपलाईन प्रकलपाला मावळ परिसरातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांचा विरोध कायम राहतो का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com