Maharashtra Politics: अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला भगदाड! भाऊसाहेब भोईर यांचा पक्षाला रामराम; विधानसभा लढण्याची घोषणा

Maharashtra Assembly Election 2024: कार्यक्रमातून भोईर यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजपचे विद्यमान आमदार त्याचबरोबर अजित पवार यांनाही व्यासपीठावरून खुले आव्हान दिले आहे.
Maharashtra Politics: अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला भगदाड! भाऊसाहेब भोईर यांचा पक्षाला रामराम; विधानसभा लढण्याची घोषणा
Maharashtra Assembly Election 2024: Saamtv
Published On

Pimpri Chinchwad Politics: अजित पवारांनी सरड्यांचे डायनोसर केल्याची घणाघाती टीका करत त्यांचेच खंदे सर्मथक असलेले पिंपरी चिंचवडमधील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला रामराम ठोकला आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर कट्टर समर्थकाने साथ सोडल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यालाच भगदाड पडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.

Maharashtra Politics: अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला भगदाड! भाऊसाहेब भोईर यांचा पक्षाला रामराम; विधानसभा लढण्याची घोषणा
Maharashtra Politics : लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले, मनोज जरांगेंना मदत करणाऱ्यांना पाडण्याचा निर्धार, १०० जागा लढणार!

आपला चिंचवड विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यासाठी भोईर यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत महानिर्धार मेळावा घेतला आणि कोणत्याही परिस्थितीत आगामी काळातील चिंचवड विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या कार्यक्रमातून भोईर यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजपचे विद्यमान आमदार त्याचबरोबर अजित पवार यांनाही व्यासपीठावरून खुले आव्हान दिले आहे.

मोरयाची भक्ती हा माझा पक्ष आणि चाफेकरांची क्रांती हा माझा लक्ष असे म्हणत भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून निवडणूक लढण्यासाठी निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी भाऊसाहेब भोईर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

Maharashtra Politics: अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला भगदाड! भाऊसाहेब भोईर यांचा पक्षाला रामराम; विधानसभा लढण्याची घोषणा
Navratra Utsav 2024: 'उदे ग अंबे उदे', आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात, देवीची मंदिरे सजली, कोल्हापूर, नाशिकमध्ये भाविकांची अलोट गर्दी

मागील तीन दशकांपासून भाऊसाहेब भोइर हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील केंद्रबिंदू राहिले आहेत .आपण अनेकवेळा अजित पवारांवर विश्वास ठेवला मात्र त्यांनी वेळोवेळी आपला विश्वासघात केला आणि दुसरीकडे भ्रष्टाचारी वृत्ती असलेल्यांची एक पिढी निर्माण केल्याचा आरोप देखील भोईर यांनी जाहीर सभेत बोलताना केला आहे.

दरम्यान, एकीकडे विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जोरदार इनकमिंग सुरु असतानाच अजित पवारांना मात्र मोठे धक्के बसत आहेत. सध्या पिंपरी चिंचवडमधील अनेक बडे नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातील डॅमेज कंट्रोल रोखण्याचे मोठे आव्हान अजित पवार यांच्यासमोर आहे.

Maharashtra Politics: अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला भगदाड! भाऊसाहेब भोईर यांचा पक्षाला रामराम; विधानसभा लढण्याची घोषणा
Maharashtra Politics: जागा वाटपाला घटस्थापनेचा मुहूर्त! महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला, 'मविआ'चे गणित काय? वाचा...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com