कुणाचं हिंदुत्व खरं हे जनताच ठरवेल! - सामना अग्रलेखाला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युउत्तर

अयोध्या येथील जमीन घोटाळा प्रकरणांमध्ये भाजपची भूमिका संशयास्पद असल्याचंही शिवसेनेनं सामनातून म्हटलं आहे.
कुणाचं हिंदुत्व खरं हे जनताच ठरवेल! - सामना अग्रलेखाला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युउत्तर
कुणाचं हिंदुत्व खरं हे जनताच ठरवेल! - सामना अग्रलेखाला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युउत्तरSaam Tv

मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून आज भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनातून शिवसेनेने भाजपच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवाय अयोध्या येथील जमीन घोटाळा प्रकरणांमध्ये भाजपची भूमिका संशयास्पद असल्याचंही म्हटलं आहे. भाजपने देश विकला असंही शिवसेनेने म्हटलं आहे. (People will decide whose Hindutva is true! - Chandrakant Patil's reply to the shivsena)

हे देखील पहा -

याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, आरोप केल्यावर चौकशी होते, चौकशी केल्यावर सगळं बाहेर येईल. सर्वसामान्य हिंदूंना भाजप आपलं हिताचे रक्षण करणारी पार्टी वाटते, उगाच 2014 ला मोदी निवडून आले का? असंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे मुख्यमंंत्र्यांच्या अधिवेशनाबाबत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीबाबत तक्रार नाही, पण जिद्दी का राहावं, त्यांनी कामकाज कोणाकडे तरी द्यावे असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी होण्यासाठी मी प्रार्थना करतो, ते मुख्यमंत्री आहेत, त्यांनी यायचा हट्ट करू नये काय गरज आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

कुणाचं हिंदुत्व खरं हे जनताच ठरवेल! - सामना अग्रलेखाला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युउत्तर
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार, अध्यक्षपदाकरता कोणती नावे चर्चेत?

पुढे ते म्हणाले की, हिंदुत्वाची भूमिका सोडल्यानंतर ज्या प्रकारे आमदार आणि खासदारांची प्रतिक्रिया येत आहेत ते पाहून शिवसेना अस्वस्थ झाली आहे. जनता ठरवेल कोणाचे हिंदुत्व खरे आहे ते. मी ठाकरे कुटुंबाचा हितचिंतक आहे, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची मी चेष्टा उडवत नाही.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांबद्दल पाटील म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी माझा बाप काढला, आमची ती संस्कृती नाही, आता जितेंद्र आव्हाड यांना उद्धव ठाकरे हे त्यांचे बाप वाटत असतील, कारण त्यांना अनेक फाईल क्लिअर करायच्या असतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com