'भाजपच्या छोट्या नेत्यांना घाबरवण्यासाठी मलिकांवर ED ची कारवाई'

'भाजपचेच छोटे नेते भाजपला सहकार्य करत नसल्याने त्या नेत्यांना घाबरविण्यासाठी ही कारवाई केंद्राने केली आहे.'
Nawab Malik: 'भाजपच्या छोट्या नेत्यांना घाबरवण्यासाठी मलिकांवर ED ची कारवाई'
Nawab Malik: 'भाजपच्या छोट्या नेत्यांना घाबरवण्यासाठी मलिकांवर ED ची कारवाई'Saam TV
Published On

रश्मी पुराणिक -

मुंबई : आज राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे आणि यावरुनच आता महाविकास आघाडीमधील नेत्यांनी भाजपवरती टीका केली आहे. आमदार रोहीत पवारांनी देखील भाजपवर आरोप केले आहेत, 'मलिकांनी अनेक दिवसांपासून भाजप, आणि केंद्र सरकारच्या विरोधात कागदपत्र दाखवले आहेत.

शिवाय उत्तर प्रदेशात (UP) मतदान सुरू आहे तिथे एसपीला वाढता प्रतिसाद मिळत आहे. भाजपचेच छोटे नेते भाजपला सहकार्य करत नसल्याने त्या नेत्यांना घाबरविण्यासाठी ही कारवाई केंद्राने केली आहे. आणि जर तुम्ही मदत केली नाहीत तर तुमच्यावर देखील अशी कारवाई केली जाईल, 'आमचं नीट ऐका..' असा संदेश द्यायचा असेल असं पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत.

Nawab Malik: 'भाजपच्या छोट्या नेत्यांना घाबरवण्यासाठी मलिकांवर ED ची कारवाई'
Disha Salian : 'दिशा सालियन आत्महत्या प्रकरणावर बोलू नका; असं राऊतांनी महापौरांना सांगितलं'

तसंच भाजपचे (BJP) अनेक पदाधिकारी आणि काही अधिकाऱ्यांच ड्रग्ज रॅकेटही नवाब मलिकांनी बाहेर काढलं आहे, आणि हे कनेक्शन गुजरात पर्यंत जाईल की काय हा भितीने देखील ही कारवाई झाले असेल असही ते म्हणाले.

दरम्यान, ईडीचे माजी अधिकरी सिंग यांना यूपीत भाजपाने तिकीट दिले हे नेमके काय सांगते सत्तेत असताना आम्ही सांगू ते करा नंतर तुम्हाला राजकारणात घेऊ, ईडीचा वापर फक्त राजकारणासाठी होतोय मुंबई मनपा निवडणूक (Mumbai Municipal Election) जवळ येत आहेत आणि त्यामुळे देखील मुंबई NCP अध्यक्ष मलिकांवर कारवाई झाली असावी, मलिक यांची अटक लोकशाही यासाठी धोक्याची घंटा असल्याचंही रोहीत पवार म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com