Diva News: मुंबईत सर्वच नागरीक लोकल ट्रेनने प्रवास करतात. चाकरमान्यांच्या गर्दीमुळे ट्रेन सकाळच्यावेळी खचाखच भरलेल्या असतात. अशात अनेकदा लोकल ट्रेन उशिराने आल्याने नागरिकांचा खोळंबा होतो. मुंबईच्या दिवा रेल्वे स्थानकात आज सकाळीच प्रवाशांचा मोठा गोंधळ पाहायला मिळाला. (Latest Local Train News)
आज सकाळी दिवा रेल्वे स्थानक येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेने ट्रॅक बदलल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसला. त्यामुळे १० मिनिटांहून अधिक काळ प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली. अखेर प्रशासनाने त्यांची समजूत काढल्यानंतर सेवा सुरळीत सुरू झाली.
नेमकं काय घडलं
सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत दिव्यातील चाकरमानी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर ऊभे होते. रोज मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल याच प्लॅटफॉर्मवर येते. मात्र आज ही लोकल ट्रेन येण्यास काही मिनिटे उशिर झाला.
उशिर झालेली ट्रेननंतर दिवा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आली. ४ वर येणारी लोकल ट्रेन २ वर आल्याने नागरिकांची मोठी धांदळ उडाली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर धाव घेतली. ट्रेन समोर ऊभे राहत रागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच ही लोकल तब्बल १० ते १५ मिनिटे थांबवून ठेवण्यात आली.
रेल्वे स्थानकात गोंधळ झाल्यानंतर आरपीएफ जवानांसह रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर नागरिक रेल्वे रुळांवरुन बाजूला झाले.
दिवा स्थानकात (Diva Station) झालेल्या गोंधळानंतर मध्य रेल्वेची वाहतूक १५ - २० मिनिटे उशिराने धावत आहे. काही तांत्रीक अडचणींमुळे जलद लोकल भांडूप स्थानकात थांबून आहेत. जलद मार्गावर भांडूप-नाहूर स्थानकादरम्यान काही तांत्रीक अडचण असल्याचं समजलं आहे. मागील २५ मिनिटांपासून लोकल भांडूप स्थानकात थांबून आहे. त्यामुळे CSMT कडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.