डोंबिवली - गेल्या काही महिन्यांपासून नियंत्रणात असलेला कोरोना (Corona) आता पुन्हा डोके वर काढू लागला आहे. त्यातच रुग्णांमध्ये होणारी वाढ आरोग्य विभगासह नागरिकांच्या चिंतेत भर टाकत आहे. शासनाकडून आरोग्य विभाग सज्ज असल्याचा दावा करण्यात येत आहे. लसीकरण, बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं जातं आहे. मात्र सुरुवातीला रांगा लावणाऱ्या नागरिकांनी वर्षभरानंतर मात्र लसिकरणाकडे (Vaccination) पाठ फिरवल्याचे आकडेवारीहून दिसून येत आहे.
हे देखील पाहा -
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संभाव्य धोक्याचा विचार करत लहान मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं सुदैवाने तिसरी लाट ओसरली. मात्र लहान मुलांच्या लसीकरणाबाबत पालक उदासीन असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. कल्याण डोंबिवलीत 12 ते 14 वयोगटातील एकूण 59 हजार 326 मुलांचे लसीकरण करण्याचा टारगेट देण्यात आला होता. मार्च मध्ये हे लसीकरण सुरू करण्यात आले साडे तीन महिन्यात यामधील अवघ्या 21 हजार 908 मुलांनी पहिला डोस तर 8 हजार 431 मुलाने दुसरा डोस घेतला एकंदरीतच 38 टक्के मुलांचा लसीकरनाचा दुसरा डोस आजमितीला पूर्ण झालेला आहे.
या वयोगटात लसीकरण वाढवण्यासाठी पालिकेकडून शाळा स्तरावर तसेच घराघरांमध्ये जनजागृती देखील करण्यात आले मात्र शाळा बंद असल्याने लसीकरण वेगाने झाले नसल्याचा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं लसीकरण वाढवण्यासाठी शाळासह ,घराघरांमध्ये देखील जनजागृती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं आहे.पालकांनी देखील मुलांचं लसीकरण करून घ्यावं अशी मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.