याबाबतीत पाकिस्तान देखील भारताच्या पुढे; हे तर मोदी सरकारचे अपयश - सचिन सावंत

अच्छे दिनाचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने देशाला अधिकाधिक कुपोषित ठेवले आहे.
याबाबतीत पाकिस्तान देखील भारताच्या पुढे; हे तर मोदी सरकारचे अपयश - सचिन सावंत
याबाबतीत पाकिस्तान देखील भारताच्या पुढे; हे तर मोदी सरकारचे अपयश - सचिन सावंतSaamTV

मुंबई : जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण ही मोदी सरकारचे (Modi Goverment) प्रचंड अपयश दर्शवणारी असून केवळ अच्छे दिनाचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने देशाला अधिकाधिक कुपोषित ठेवले आहे. असे ट्विट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केले आहे. (Pakistan also ahead of India; This is a complete failure of the Modi government - Sachin Sawant)

जागतिक भूक निर्देशांकात (Global Appetite Index) 2013 साली भारताचा 63 वा क्रमांक होता मात्र आज तोच क्रमांक 101 झाला आहे. 2012 ला 28.8 असलेले गुण 2021 ला 27.5 झाले. पाकिस्तान , नेपाळ , बांग्लादेश (Pakistan Nepal Bangladesh) हे देश देखील सातत्याने आपल्या पुढे आहेत. CHILD WASTING म्हणजे 5 वर्षांखालील अत्यंत कुपोषित (Malnourished) मुलांच्या श्रेणीत गेली 5 वर्षे भारत जगात सर्वात मागे असल्याचा खुलासा सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

याबाबतीत पाकिस्तान देखील भारताच्या पुढे; हे तर मोदी सरकारचे अपयश - सचिन सावंत
आज 'या' नाटकाचा प्रयोग होणार आहे का? सेनेच्या दसरा मेळाव्यावरती राणेंची टीका

तसेच केवळ छाती बडवत गमजा मारुन व योजनांची नावे बदलून होत काही होत नाही. मिड- डे मीलचे (Mid-Day Meal) नाव पीएम पोषण (PM nutrition) केले पण जनतेचे शोषण वाढवले. मोदी सरकार सपशेल नापास आहे झालं असल्याचा आरोपही सावंत यांनी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com