पडळकरांच्या इशाऱ्यानंतर रिक्त जागांसाठी MPSC नं परिपत्रक काढलं

पीएसआयच्या भरतीमध्ये अवघ्या ३ जागा दिल्यामुळे धनगर समाज मधील विद्यार्थ्यांनी एमपीएससी आयोगाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पडळकरांच्या इशाऱ्यानंतर रिक्त जागांसाठी MPSC नं परिपत्रक काढलं
पडळकरांच्या इशाऱ्यानंतर रिक्त जागांसाठी MPSC नं परिपत्रक काढलंSaam Tv
Published On

पुणे : पीएसआयच्या PSI भरतीमध्ये अवघ्या ३ जागा दिल्यामुळे धनगर समाज मधील विद्यार्थ्यांनी students एमपीएससी MPSC आयोगाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यानंतर MPSC आयोगामार्फत राज्यामधील भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये बिंदू नामावलीनुसार धनगर समाजाला ३.५ टक्के आरक्षित जागा द्यावे.

बिंदू नामावलीनुसार धनगर समाजामधील विद्यार्थ्यांना जागा दिले नाही तर, रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहे, असे सांगत भाजप BJP आमदार MLA गोपीचंद पडळकरही Gopichand Padalkar ​आक्रमक झाल्याचे यावेळी बघायला मिळाले आहे.

हे देखील पहा-

पडळकरांच्या इशाऱ्यावर आता एमपीएससी आयोगाने एक परिपत्रक काढले आहे. विविध विभागामधील पदसंख्या आणि आरक्षितक जागा हा विषय आयोगाच्या अखत्यारित येत नाही. तर हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित मध्ये येतो, असे एमपीएससी आयोगाने स्पष्ट केले आहे. विविध विभागामधील पदसंख्या आणि आरक्षित जागा हा विषय आयोगाच्या अखत्यारीत येत नाही. राज्य शासनाच्या अखत्यारीत हा विषय येतो.

पडळकरांच्या इशाऱ्यानंतर रिक्त जागांसाठी MPSC नं परिपत्रक काढलं
Gopichand Padalkar | पडळकरांच्या शर्यतीला पोलिसांचा ब्रेक

शासनाने दिलेल्या मागणीपत्रानुसार आम्ही भरती करतो. आरक्षित जागांचा विषय आमच्याकडे येत नाही, असे एमपीएससी आयोगाने एका परिपत्रकातून म्हटले आहे. एमपीएससीच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, महाराष्ट्र लोकसेवा अभियांत्रिकी सेवा २०२० आणि राज्य सेवा पुर्व परीक्षा २०२० या ३ ही पुर्व परीक्षांचा निकाल हा पुढच्या आठवड्यात लागणार आहे, अशी माहिती एमपीएससी आयोगाने यावेळी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com