मीरा/भाईंदर : मीरा भाईंदरमध्ये (Mira Bhayander) मरणानंतरही यातना कायम अशा प्रकारचा कारभार पाहण्यास मिळाला आहे. भाईंदर पश्चिमेच्या स्मशानभूमीचे एक वेदनादायक प्रकरण समोर आले, गॅस सिलेंडर संपल्यामुळे मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत तीन दिवस खितपत पडून होता याची खबर स्थानिकांना मिळताच त्यांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. मीरा भाईंदर मध्ये मेल्यानंतरही यातना कायम असल्याचं या घटनेवरून सिद्ध झाले आहे तसेच पालिकेच्या या ढिसाळ कारभाराचा नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Outrage from citizens over the management of Mira Bhayander Municipality)
हे देखील पहा-
स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचे गॅस सिलेंडर संपल्यामुळे, एक मृत देह (Dead body) विद्युतदाहिनी मध्ये तीन दिवस अर्धवट जळलेल्या अवस्थेत पडून राहिला, नंतर त्या विद्युतदाहिनी मध्ये गॅस रिफिल केल्यानंतर त्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या प्रकरणी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत मात्र या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.