बारामती: येथील न्हावी गावात प्रतिबंधित खसखस म्हणजेच अफूची शेती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने आपल्या शेतात मक्याच्या पिकात अफूची लागवड केली होती. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत वालचंदनगर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकासोबत संयुक्त ऑपरेशन राबवले.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल २७ लाख ५६ हजार ४६० रुपये किमतीची ८८३ किलो वजनाच्या अफूच्या झाडांसह बोंड जप्त केली आहेत. तसेच तिघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींची नावे रतन कुंडलिक मारकड, बाळू बाबुराव जाधव आणि कल्याण बाबुराव जाधव अशी असून, त्यांच्या विरोधात वालचंदनगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस.अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये 96 किलो गांजा जप्त
पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी आंतरजिल्हा गांजा तस्करी करणाऱ्या टोळीकडून जवळपास 96 किलो गांजा जप्त करून, गांजा तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अमली पदार्थांची तस्करी करणारे काही तस्कर हे चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोहकल फाटा येथून चारचाकी वाहनांमधून अमली पदर्शांची तस्करी करणार आहेत. अशी गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला आणि तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,
संजय पांडुरंग मोहिते, मनसाराम नूरजी धानका आणि एक महिला अशा तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून जवळपास 63 लाख 61 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यात 96 किलो गांजा, 2 चारचाकी वाहन आणि तीन मोबाईलचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.