Mumbai : दारुच्या नशेत खदानीत उतरलेल्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यू, एकजण बेपत्ता

Accidental Death : हे सहाही तरुण बोरिवलीच्या भीम नगर परिसरातील राहणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
drowned in water
drowned in waterSaamTv
Published On

मुंबई: दारुच्या नशेत साचलेल्या पाण्यात उतरलेल्या ६ तरुणांपैकी एकाचा पाण्यात बुडून (drowned in water) मृत्यू झाला आहे, तर चार जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र बुडालेल्या एकजण अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. मुंबईच्या दहिसरमधील ही घटना असून दारुमुळे हा दुर्देवी अपघात झाला आहे. (Accidential Death In Mumbai)

हे देखील पाहा -

गेल्या आठवड्याभरापासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबईतील काही भागांत पाणी साचले आहे. मुंबईच्या दहिसरमधील महाराष्ट्र खदान, केतकीपाडा येथेही पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यात उतरल्याने एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. साचलेल्या पाण्यात उतरलेल्या ६ तरुणांपैकी ४ जणांना वाचवण्यात यश आले तर एकाचा मृत्यू झाला असून बुडालेल्या आणखी एका तरुणाचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे सहाही तरुण बोरिवलीच्या भीम नगर परिसरातील राहणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ५ जुलैच्या रात्री पावसात हे सहा जण बाहेर निघाले होते. यात १) पप्पू लखनलाल यादव २) आकाश संपत गायकवाड, वय ३१ वर्ष ३) दीपक जवाहरलाल जयस्वार, वय २१ वर्षे ४) गणू जवाहरलाल जयस्वार वय १९ वर्षे ५) शेखर पप्पू विश्वकर्मा, वय २३ वर्षे ६) अजय बाळासाहेब जोगदंड, वय २० वर्षे हे सहा तरुण बोरिवली पश्चिम येथील गोराई ब्रिज, भीम नगर येथे दारू प्यायला बसले होते. ५ वाजताच्या च्या सुमारास अजय याच्या रिक्षाने हे तरुण या ठिकाणी फिरण्यासाठी आले होते.

यावेळी शेखर पप्पू विश्वकर्मा हा २३ वर्षीय तरुण आणि अजय बाळासाहेब जोगदंड हा २० वर्षीय तरुण हे दोघेजण महाराष्ट्र खदानीच्या डॅममध्ये पोहण्यास गेले. खदानीत पोहत हे दोघं मध्यापर्यंत गेले, मात्र ते परत येत असताना पाण्यात बुडू लागले त्यावेळी ते आरडा ओरड करू लागले. तेव्हा त्या दोघांना वाचवण्यासाठी दीपक आणि आकाश हे दोघेजण पाण्यात गेले असता तेही मिळून आले नाहीत.

drowned in water
Maharashtra Rain Update: मुंबईत ९ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट; कोल्हापुरात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

या प्रकारानंतर स्थानिक लोकांना मदतीला बोलवले, त्यांच्यापैकी एकाने पोलिसांना फोन करून बोलावले असता त्या ठिकाणी पोलीस तसेच फायर ब्रिगेडचे अधिकारी पोहचले आणि घटनास्थळावर शोधकार्य सुरू केले. दरम्यान बुडालेल्या तरुणांपैकी शेखर पप्पू विश्वकर्मा या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह मिळून आला, तर अजय बाळासाहेब जोगदंड, वय 20 वर्ष, याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com