Pune : रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीच्या अंगावरती वाहन चालकाने घातली गाडी; पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

एक पादचारी जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
Pune : रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीच्या अंगावरती वाहन चालकाने घातली गाडी; पादचाऱ्याचा जागीच मृत्यू
Pune : रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीच्या अंगावरती वाहन चालकाने घातली गाडी; पादचाऱ्याचा जागीच मृत्यूSaam TV

पुणे : नर्हे (Narhe) येथील नवले पुला खालील सेवा रस्त्यावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू (Death on the spot) झाला आहे. मृत व्यक्तीचे ओळख अद्याप पटलेली नाही.

हे देखील पहा -

सदरची घटना दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास नवले पुलाजवळ घडली. नवले पुलाजवळ एक पादचारी जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू पावलेल्या तरुण बेवारस असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले आहे.

Pune : रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीच्या अंगावरती वाहन चालकाने घातली गाडी; पादचाऱ्याचा जागीच मृत्यू
महावितरणने कापली तहसील कार्यालयाची वीज; संतप्त तहसीलदारांनी केले थेट महावितरण कार्यालय सील

याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास सिंहगड रस्ता ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com