महावितरणने कापली तहसील कार्यालयाची वीज; संतप्त तहसीलदारांनी केले थेट महावितरण कार्यालय सील

महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी थेट नंदुरबार तहसील कार्यालयात जाऊन मुख्य वीज पुरवठाच खंडित केला. त्यामुळे तहसील कार्यालयातील काम ठप्प झाले आणि यामुळे महावितरण आणि महसूल दोन खात्यांमध्ये वादाची ठिणगी पडली.
महावितरणने कापली तहसील कार्यालयाची वीज; संतप्त तहसीलदारांनी केले थेट महावितरण कार्यालय सील
महावितरणने कापली तहसील कार्यालयाची वीज; संतप्त तहसीलदारांनी केले थेट महावितरण कार्यालय सीलदिनू गावित

नंदुरबार : वीज बिलाची थकबाकी भरत नाही म्हणून महावितरण (MSEDCL Company) कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट नंदुरबार तहसील कार्यालयाचा (Tehsil Office) वीजपुरवठा खंडित केला मात्र संतप्त तहसीलदारांनी महसुलाची थकबाकी भरत नाही म्हणून महावितरणचे कार्यालय सील करीत महावितरणलाच शॉक दिला आहे. त्यामुळे आता महसूल आणि महावितरण (Revenue and MSEDCL) यां दोघांमधला वाद पोलीस ठाण्यात पोहोचला आहे.

हे देखील पहा -

दरम्यान संबंधित वरिष्ठ अधिकारी दोन्ही विभागाचा समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती दिली आहे. MSEDCL कंपनीने सर्वत्र थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम चालवली आहे. थकबाकीदारांवर गुन्हे देखील दाखल केले जात आहेत. वरिष्ठांच्या आदेशामुळे कठोरपणे अंमलबजावणी करणाऱ्या महावितरणच्या कार्यकारी उपअभियंता मनीषा कोठारी यांनी नंदुरबार तहसील कार्यालयाला वीज बिलाची थकीत रक्कम त्वरित भरण्याचे सांगितले होते. परंतु ट्रेझरी मधून बिलाची रक्कम हस्तांतरित होण्याला अवकाश असल्यामुळे वीज बिल भरले गेले नाही.

तोपर्यंत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी थेट नंदुरबार तहसील कार्यालयात जाऊन मुख्य वीज पुरवठाच खंडित केला. त्यामुळे तहसील कार्यालयातील काम ठप्प झाले आणि यामुळे महावितरण आणि महसूल दोन खात्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. मग तहसील कार्यालयाने देखील महावितरण कंपनीच्या सब स्टेशन (Sub station) आणि कार्यालयांकडे थकीत असलेल्या महसूलचा भरणा का केला नाही अशी विचारणा करीत थेट नंदुरबार शहरातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला सील ठोकले.

महावितरणने कापली तहसील कार्यालयाची वीज; संतप्त तहसीलदारांनी केले थेट महावितरण कार्यालय सील
अल्पवयीन मेहुणीच्या प्रेमात दाजी आंधळा; लग्न करण्यासाठी मित्रांच्या साह्याने बायकोची केली हत्या

या कारवाईमुळे वीज वितरणच्या या कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान संतप्त कार्यकारी अभियंता पाटील अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी आणि कर्मचारी यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिस ठाणे गाठले. तसेच तहसीलदार भाऊसाहेब थोरातांनी महावितरणच्या सर्व कार्यालयांची थकबाकी वसूल करण्यासाठी धडक मोहीम राबवण्याचा इशारा देत गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे.

Edited By - Jagdish patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com