प्राची कुलकर्णी
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मेट्रोचे (metro) उद्घाटन केल्यानंतर पहिल्याच दिवशी दोन्ही मार्गावर २२ हजार ४३७ पुणेकरांनी (Punekar) मेट्रोच्या सफरीचा आनंद लुटला आहे. यातून महामेट्रोला पहिल्याच दिवशी ५ लाख ५३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रात्री ९ वाजता मेट्रोची शेवटची फेरी झाली आहे. (On the first day alone 22000 Punekars enjoyed Metro Safari)
हे देखील पहा-
त्यानंतर मेट्रोने दिलेल्या आकडेवारीनुसार वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर १५ हजार ८४२ नागरिकांनी प्रवास केला. तर फुगेवाडी ते पिंपरी या मार्गावर ६ हजार ९९५ नागरिकांनी प्रवास केला आहे. यातून महामेट्रोला ५ लाख ५३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. काल उद्घाटनाच्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी स्वत: तिकीट काढून गरवारे स्टेशन ते आनंदवाडी पर्यंतचा प्रवास केला आहे.
मेट्रो उद्घाटन कार्यक्रमावर बोलत असताना पंतप्रधानांनी म्हटले होते की, अगोदर भूमिपूजन व्हायचे मात्र, उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचे नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो लोकार्पणात लगावला होता. सध्याच्या काळात भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे दाखवले असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले होते. समाजातील सर्वच घटकांनी आता मेट्रोचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.