मुंबई: परमबीर सिंग (Param Bir Singh) प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी आता सीबीआयच्या रडारवर आहेत. हा तपास करणाऱ्या सर्व तपास अधिकाऱ्यांना सीबीआय (CBI) समन्स पाठवणार आहे. या चौकशीदरम्यान तपास अधिकाऱ्यांचे जबाब सीबीआय नोंदवू शकते. हे सर्व राज्य सरकारने नियुक्त केलेले तपास अधिकारी असून सीआयडी, गुन्हे शाखा किंवा ठाणे पोलिसांत ते सध्या कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांनी तपास (Investigation) कसा केला हे जाणून घेण्यासाठी सीबीआय त्यांचे जबाब नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Officers investigating Param Bir Singh's case on CBI's radar)
हे देखील पाहा -
मुंबईचे माजी पोलीस (Mumbai Police) आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध वसुली प्रकरणाचा तपास महाराष्ट्रात सुरु आहे. मात्र आता सीबीआय लवकरच परमबीर सिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या सर्व तपास अधिकाऱ्यांना समन्स पाठवणार आहे. सीबीआय परमबीर सिंह यांच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवू शकते. हे सर्व अधिकारी राज्य सरकारने नियुक्त केलेले तपास अधिकारी असून सीआयडी, गुन्हे शाखा किंवा ठाणे पोलिसांत कार्यरत आहेत. परमबीर सिंह प्रकरणाचा तपास करणाऱ्या या अधिकाऱ्यांनी तपास कसा केला हे जाणून घेण्यासाठी सीबीआय त्यांचे जबाब नोंदवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
परमबीर सिंग यांची 'ही' प्रकरणे सीबीआयकडे वर्गीकृत केली आहेत:
१) सिंग यांच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास ठाणे पोलीस करत होती.
२) ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या वसूलीच्या गुन्ह्याचा तपास सीआयडी करत आहे.
३) मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या वसुलीच्या गुन्ह्याची सीआयडी चौकशी करत होती
४) ठाण्यातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा तपास सीआयडी करत होती.
५) मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या वसुलीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट ११ करत होते.
६) याशिवाय सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची एसीबी खुली चौकशी करत होती.
हे सर्व गुन्हे आता सीबीआयकडे वर्ग झाल्याने सीबीआय या प्रकरणाचा पारदर्शक तपास करत आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.