१००-२०० नव्हे, तब्बल '१००० कोटी रुपये वसुली'चं ठाकरे सरकारचं टार्गेट! - भाजप आमदाराचा गंभीर आरोप...

हे वसुलीचं काम मुंबई मनपाचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे.
१००-२०० नव्हे, तब्बल '१००० कोटी रुपये वसुली'चं ठाकरे सरकारचं टार्गेट! - भाजप आमदाराचा गंभीर आरोप...
१००-२०० नव्हे, तब्बल '१००० कोटी रुपये वसुली'चं ठाकरे सरकारचं टार्गेट! - भाजप आमदाराचा गंभीर आरोप...Saam Tv
Published On

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: भाजप आमदार अमित साटम यांनी ठाकरे सरकारवर '1000 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट' दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. उत्पादन शुल्क विभाग, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग आणि मुंबई महानगरपालिका या सर्वांना 1000 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे वसुलीचं काम मुंबई मनपाचे आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून अमित साटम (BJP MLA Ameet Satam) यांनी आयुक्त इक्बालसिंह चहल यांचा उल्लेख 'महाविकास आघाडीचा सर्वात मोठा एजंट' असा केला आहे. (Not 100-200, Thackeray government's target of '1000 crore rupees recovery'! - Serious allegation of BJP MLA)

हे देखील पहा -

नेमकं काय म्हणालेत अमित साटम?

भाजप आमदार अमित साटम म्हणाले की, आता ख्रिसमस आहे आणि त्यानंतर नवीन वर्ष आहे. या काळात 1000 कोटी रुपयांच्या वसुलीचं षडयंत्र महाविकास आघाडी सरकार करणार आहे. कशाप्रकारे करणार?. तर क्लब, रेस्टॉरंट, बार, लग्नसोहळे आहेत आणि आता तर त्यांनी सांगितलंच आहे की, घरातही येणार आहे. तुम्ही इमारतीच्या टेरेसवर पार्टी केली तरी तेथे बीएमसी येणार. पोलीस येणार, असे म्हणत अमित साटम यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केलीय आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारमधील नेते या गंभीप आरोपाला काय उत्तर देतात हे पहावं लागेल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com