नो टेन्शन; डेल्टा प्लस धोकादायक नाही !

राज्यात डेल्टाचे रुग्ण ८० टक्के, तर डेल्टा प्लसचे अवघे अर्धा टक्के रुग्ण
नो टेन्शन; डेल्टा प्लस धोकादायक नाही !
नो टेन्शन; डेल्टा प्लस धोकादायक नाही !Saam Tv
Published On

पुणे - राज्यात 12 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे Delta Plus 45 रुग्ण आढळून आले असले तरी घाबरून जाण्याची परिस्थिती नाही. कारण प्रत्येक 100 रुग्णांमागे 80 रुग्णांमध्ये डेल्टाचे विषाणू Virus आढळत आहेत. तर प्रत्येक 100 रुग्णांमागे 0.5 रुग्णांमध्ये डेल्टा प्लसचे विषाणू आढळून आले आहेत. विशेष म्हणजे डेल्टा प्लस फारसा गंभीर नाही, असाही निष्कर्ष समोर आला आहे.

कोरोनाच्या डेल्टा प्लस या विषाणूने मोठी दहशत निर्माण केली असली तरी राज्यात केल्या गेलेल्या सर्वेक्षणात दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. राज्याच्या विविध भागात आढळलेल्या डेल्टा प्लसच्या 45 रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम लक्षणे प्राथमिक दृष्टया आढळून आली आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात या बाबी समोर आल्या आहेत.

हे देखील पहा -

राज्यात 8000 रुग्णांच्या नमुन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी तरी मास्क आणि सुरक्षित अंतर याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.तर राज्यात जळगाव 13, रत्नागिरी 11, मुंबई 6, ठाणे 5, पुणे 3, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, सांगली,नंदुरबार, औरंगाबाद,पालघर  या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक असे ४५ रुग्ण डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आढळून आले आहेत.

विषाणूमध्ये जनुकीय बदल होणे हा नैसर्गिक भाग आहे. असे बदल झाले नाहीत तर ते जास्त धोकादायक असते. मात्र कोरोनामधील जनुकीय बदल फारसे गंभीर नसल्याने दिलासा मिळत आहे. डेल्टा प्लसला घाबरून न जाता मास्क वापरणे. सुरक्षित अंतर ठेवणे. स्वतःची काळजी घेणे, हेच यावरचे उपचार आहेत, असं आवाहन आरोग्य विभाग करतोय... त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नसली तरी काळजी घेणंही तितकेच आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com