Ulhasnagar: करबुडव्यांना पालिकेची 21 दिवसांची डेडलाईन; कर न भरल्यास संपत्ती जप्त

Ulhasnagar Municipal Corporation: कर भरला नाही तर महानगरपालिका मालमत्ता जप्त करणार आहे. कर भरण्यासाठी करबुडव्यांना महापालिकेने 21 दिवसांची डेटलाईन दिली आहे.
Tax notice to Ulhasnagar Peoples by UMC
Tax notice to Ulhasnagar Peoples by UMCअजय दुधाणे

उल्हासनगर: उल्हासनगर पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून तब्बल 65 हजार करबुडव्यांना वॉरंट दिले आहेत. त्यात 20 हजार रुपयांच्या वरील करबुडव्या मंडळींचा समावेश आहे. वॉरंट मिळाल्याचा 21 दिवसांत कर (Tax) भरला नाही तर महानगरपालिकेकडून मालमत्ता-संपत्ती जप्त करण्यात येणार, असा इशारा मालमत्ता कर विभागाच्या उपआयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिला आहे. (UMC's 21-day term for tax evaders; Assets confiscated if tax is not paid)

हे देखील पहा -

उल्हासनगर (Ulhasnagar) महानगरपालिका कर विभागाची येथील मालमताधारकांवर 600 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात चालू वर्षाची 120 कोटींची मागणी, 180 कोटी जुनी थकबाकी आणि या थकबाकीवर 300 कोटी रुपयांचा दंड आहे. तर जवळपास 60 हजार करबुडव्यांवर 450 कोटींची थकबाकी आहे. महानगरपालिका उपआयुक्त प्रियंका राजपूत यांनी मार्च अखेर पर्यंत 100 कोटी रुपये वसुलीचे लक्ष केंद्रित केले आहे. या आदेशानंतर दोन दिवसातच 47 कोटी रुपयांची वसूली केली आहे. अद्याप अडीच महिने असून ज्या पद्धतीने 65 हजार करबुडव्यांना वॉरंट बजावण्यात आलेत आणि मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी म्हटलंय

Tax notice to Ulhasnagar Peoples by UMC
Mumbai Crime: काश्मिरमध्ये चरस पुरवणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

मालमत्ता कर भरला नाही तर नागरिकांची मालमत्ता सील करून जप्त करणे, हे आम्हाला सुद्धा योग्य वाटत नसून, मात्र महापालिकेचे उत्पन्नाचे मालमत्ता कर हे एकमेव साधन असून मालमत्ता कराच्या निधीवर महानगरपालिका चालते. त्यामुळे ही कठोर पावले उचलावी लागत असल्याने शहरातील करबुडव्या नागरिकांनी लवकरात लवकर आपला मालमत्ता कर भरून कारवाई पासून वाचून महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com