अजित पवारांबद्दल प्रश्न विचारताच देहू संस्थानचे मोरे महाराज पत्रकारांवर भडकले

जगद्गुरु तुकाराम महाराज देहू मंदिर संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे हे आज पत्रकारांवर चांगलेच भडकले.
Tukaram Maharaj Mandir Sansthan Dehu
Tukaram Maharaj Mandir Sansthan DehuSaam TV

पुणे : पिंपरी विधानसभा क्षेत्राचे आमदार अण्णा दादू बनसोडे यांनी आज पिंपरी-चिंचवड शहरातील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत, जगद्गुरु तुकाराम महाराज देहू (Dehu) मंदिर संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे (Nitin Maharaj More) देखील सहभागी झाले होते.

पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर पत्रकारांनी नितीन महाराज मोरे यांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषण का करू दिले नाही? असा प्रश्न विचारलं असता, नितीन महाराज मोरे हे पत्रकारांवर चांगलेच भडकले, 'तुम्ही हा प्रश्न मलाच का विचारता? अजित दादांना का विचारत नाही.' असं म्हणत मोरे महाराज रागाच्या भरात पत्रकार परिषद सोडून चालले होते.

हे देखील पाहा -

मात्र, आयोजकांनी त्यांना विनंती केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत (Press conference) थांबले. भागवत संप्रदायातील वारकरी हे त्यांच्या शांत, संयमी, दयाळू आणि अध्यात्मिक स्वभावासाठी ओळखले जातात, मात्र, आज झालेल्या पत्रकार परिषदेत मोरे महाराजांचे रौद्र रूप पाहायला मिळालं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com