नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, सेनेच्या टक्केवारी गँगमुळे...

राणे यांनी पालिकेच्या आयुक्तांना भ्रष्टाचाराविरोधात कडक कारवाई करा अशा आशयाचं एक पत्र पाठवंल आहे.
NItesh Rane Vs Aditya Thackeray
NItesh Rane Vs Aditya ThackeraySaam TV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी पालिकेचे प्रशासक या नात्याने आपल्यावर पालिकेची ही भ्रष्टाचारी ओळख पुसण्याची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. तर आदित्य सेनेच्या टक्केवारी गँगमुळे पालिका भष्ट्राचारासाठी चर्चेत असल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.

राणे विरुद्ध ठाकरे (Rane vs Thackeray) हा वाद सर्वश्रुत आहे. मुंबई महापालिकेचा (BMC) सर्व कारभार ठाकरेंकडे आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राणेंच्या मुंबईतील बंगल्यावर पालिकेने कारवाई केली होती. तर मुंबई पालिकेत भ्रष्टाचार होतो आणि जाणीवपुर्वक आपल्या विरोधकांवर ठाकरे पालिकेच्या आडून कारवाई करत असल्याचा आरोप राणे कुटुंबीय आणि भाजपकडून सतत करण्यात येतो.

अशातच आता राणे यांनी पालिकेच्या आयुक्तांना भ्रष्टाचाराविरोधात कडक कारवाई करा अशा आशयाचं एक पत्र पाठवंल आहे. मात्र, या पत्रात त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि त्यांच्या गॅँगमुळे पालिका भ्रष्टाचारासाठी चर्चेत असल्याचं म्हटल्यामुळे नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.

या पत्रात नितेश राणे यांनी लिहलं आहे की, 'सातत्याने मुंबई महानगर पालिका ही आदित्य सेनेच्या टक्केवारी गँगमुळे भष्ट्राचारासाठीच चर्चेत राहिली आहे, म्हणूनच प्रशासक या नात्याने आपल्यावर पालिकेची ही भ्रष्टाचारी ओळख पुसण्याची जबाबदारी आहे.

पाहा व्हिडीओ -

पण मुंबई उच्च न्यायलायाने घाटकोपर येथील पश्चिम किरोळ गावातील एका इमारत पुनर्विकास प्रकल्पांतर्गत जलवाहिनीची सुविधा नसताना महापालिकेने अंशत: भोगवटा प्रमाणपत्र (पार्ट ओसी) दिले, यावर महापालिकेच्या भ्रष्टाचारी कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले आहेत.

महापालिकेचे प्रशासक म्हणून आपले अधिकार हे केवळ बदली करता मर्यादित नसून अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मुभा देतात. नेहमीप्रमाणे दुर्घटना आणि जिवीतहानी झाल्यानंतर मुंबई प्रशासनाला जाग येते हा समज दुर करणे हे प्रशासक म्हणून आपल्याकडून अपेक्षित असल्याचं राणे यांनी पत्रात म्हटलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com