Nirbhaya Squad In Mumbai: महिलांच्या सुरक्षेसाठी अवतरली 'निर्भया' १०३ वर फोन केल्यास मिळणार तात्काळ मदत...

Nirbhaya Squad In Mumbai Police: निर्भया पथकाबाबत सोशल मिडियावरही पोलिसांचे स्वतंत्र साईट फेसबुक, इंन्स्टाग्राम, आणि व्हाॅटसअॅप वर असणार आहे.
Nirbhaya Squad In Mumbai Police Force
Nirbhaya Squad In Mumbai Police ForceTwitter/ @mumbaipolice
Published On

मुंबई: मुंबईतील महिला अत्याचार रोखण्यासाठी मुंबई पोलीस दलात आता निर्भया पथकाची (Nirbhaya Squad) स्थापना करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांच्या (Dilip Walse-Patil) हस्ते या पथकाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. संकटात असलेल्या महिलांच्या हाकेला त्वरित मदत देणे हे या पथकाचे मुख्य कार्य असणार आहे. मुंबईतील सर्व पोलीस (Mumbai Police) ठाण्यात २४ तास हे पथक सजग असणार आहे. (Mumbai: Establishment of Nirbhaya Pathak for women's safety; Get immediate help by calling 103)

हे देखील पहा -

मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी निर्भया पथकाबाबत (Nirbhaya Squad) माहिती दिली की, महिला सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांचे काम नाव लौकिक आहे. या प्रकरणात गांभीर्यपूर्वक आणि तातडीने त्या गुन्ह्यात दोषारोप दाखल केले जातात. महिलांसंदर्भातील गुन्हे हे कायमच मुंबई पोलिसांसाठी महत्वाचे आहे. या प्रकरणीच आपण निर्भया पथकाची स्थापना करत आहोत. जेणेकरून गरजू महिलांना तातडीने मदत मिळेल. हे पथक मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक किंवा पोलिस उपनिरीक्षकाच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र मोबाइल फोन, वाहने पुरवण्यात आली असून १०० किंवा १०३ हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. निर्भया पथकाबाबत सोशल मिडियावरही पोलिसांचे स्वतंत्र साईट फेसबुक, इंन्स्टाग्राम, आणि व्हाॅटसअॅप वर असणार आहे. मुंबई पोलिस दलात 'एम पावर' संस्थेतर्फे महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ५ समुउपदेश केंद्र सुरू करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

मुंबई पोलीस आयुक्त पुढे म्हणाले की, पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनाही स्वतंत्र 'महिला कक्ष' कामही प्रगती पथवर आहे. मुंबईतील निर्जनस्थळी, धोकादायक ठिकाण, शाळा काॅलेज व महाविद्यालय या ठिकाणी पोलिसांची गस्ती कायम ठेवून क्यूआर कोड स्कॅनिंग लावण्यात आलेले आहे.

Nirbhaya Squad In Mumbai Police Force
Republic Day 2022: महाराष्ट्राच्या चित्ररथाची कविता गायक सुदेश भोसले यांच्या आवाजात

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेच्या हस्ते ५ समुपदेशन केंद्राचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. निर्भया पथकासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टीकडून (Rohit Shetty) ५० लाख देणगी देण्यात आली, तसेच मुख्यमंत्री सहायत्ता निधीला ११ लाखाचा धनादेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आला. निर्भया सुरक्षा मार्गदर्शिकेचंही अनावरन यावेळी करण्यात आलं. या मार्गदर्शिकेत महिलांसंदर्भात मदतीसाठी असलेले हेल्पलाईन, संपर्क क्रमांक, महिला गुन्ह्यांसंदर्भत नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांची कलम अशी माहिती यात देण्यात आलेली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com