मुंबई : पॉप्युवर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (PFI) राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. NIA ने पुन्हा एकदा राज्यातील औरंगाबाद, ठाणे, सोलापूर, नांदेड, सोलापूर, जालना आणि परभणी येथे छापेमारी केली आहे. या छापेमारीत पीएफआयच्या अनेक संशयित कार्यकर्त्यांना जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अलीकडेच NIA ने 95 ठिकाणी छापे टाकून 106 PFI नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली होती. (NIA Raids on PFI Latest News)
8 राज्यांतील 25 हून अधिक ठिकाणी छापेमारी
NIA कडून देशभरात कारवाईचा सपाटा सुरूच आहे. एनआयएसह इतर यंत्रणांनी पुन्हा एकदा देशभरातील 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'च्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. 8 राज्यांत केलेल्या या छापेमारीत 25 जवळपास 25 जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, NIA नं कारवाईचा दुसरा राऊंड सुरू केला आहे. अलिकडेच एनआयएनं केरळमधून (Keral पीएफआय सदस्य शफिक पैठला अटक केली होती. त्यामुळे यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाटणा रॅली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या निशाण्यावर असल्याचे चौकशीदरम्यान उघड झालं होतं.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी
दरम्यान, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात एकाच वेळी ATS आणि NIA ने गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने छापे टाकले आहेत. सोलापूरमधून एका संशयिताला NIA कडून अटक करण्यात आली असून PFI च्या एका कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याचबरोबर औरंगाबाद शहरातून १४ जणांना, तर ठाण्यातून एका संशयित कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित कार्यकर्त्यांना लवकरच कोर्टात हजर केलं जाणार असल्याची माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.