अमेरिकेच्या स्पेस टुरिझम 'न्यु शेफर्ड'च्या टिममध्ये कल्याणची तरुणी

अंतराळात झेपावणारे यान (Spacecraft) बनवणाऱ्याच्या टीम मधील कल्याण पूर्व मधील एका तरुणीचा समावेश आहे.
संजल गावंडे
संजल गावंडेप्रदिप भणगे
Published On

प्रदिप भणगे

कल्याण: अंतराळात झेपावणारे यान (Spacecraft) बनवणाऱ्याच्या टीम मधील कल्याण पूर्व मधील एका तरुणीचा समावेश आहे. त्यामुळे कल्याण शहराची पताका थेट अंतराळात आणि पर्यायाने अमेरिकेत (USA) फडकली आहे. अमेरिकेमधील 'ब्ल्यू ओरिजिन' (Blue Origin) या स्पेस कंपनीने अंतराळ सफरीची घोषणा केली आहे.

येत्या 20 जुलैला या कंपनीतर्फे 'न्यु शेफर्ड' हे खासगी यान जगप्रसिद्ध ब्रँड अमेझॉनचे संस्थापक आणि ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांच्यासह काही निवडक पर्यटकांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे. हे यान बनवणाऱ्या कंपनीच्या टिममध्ये कल्याणमधील संजल गावंडे (Sanjal Gawande) या तरुणीचा समावेश आहे. इंजिनिअरीगचे शिक्षण पूर्ण करत विविध परीक्षा देत संजल हिने या उंचीवर झेप घेतली आहे.तिच्या या यशामुळे तिच्या कुटूंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संजल गावंडे
मिरज तालुक्यात दोन ठिकाणी बाल विवाह; नातेवाईकांवर गुन्हा दाखल

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या संजल हिची आई सुरेखा गावंडे या एमटीएनएलमधील तर वडील अशोक गावंडे हे केडीएमसीतील निवृत्त कर्मचारी आहेत.अतिशय कठीण परिस्थितीत तिने हे यश मिळवण्याचे तिच्या आई ने सांगितले आहे. तर कल्पना चावला आणि सुनीता व्हीलयम्स याच्या सारखे अंतराळात जाण्याचे संजल चे स्वप्न आहे आणि ते ती पूर्ण करणार असा विश्वास तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.

अंतराळ क्षेत्रात 'न्यु शेफर्ड' अंतराळ सफर चे लाँचिंग म्हणजे एक मैलाचा दगड समजला जात आहे. हे रॉकेट डिझाईन करणाऱ्या 10 जणांच्या टिममध्ये संजलचा समावेश असल्याने कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com