मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची नवी खेळी; भाजपच्या अडचणी वाढणार?

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे.
Political News
Political NewsSaam Tv
Published On

मुंबई - राज्यसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली आहे. राज्यसभा निवडणुकीसारखा विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून महाविकास आघाडी सतर्कता (Maha Vikas Aghadi) बाळगत आहे. दुसरीकडे भाजपने (BJP) देखील निवडणुकीबाबत सावध भूमिका घेतली असून त्यांचा कोणताही नेता उघडपणे बोलत नाहीये. अशातच विधान परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने नाव प्लॅन आखला असल्याची माहिती आहे.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात 11 उमेदवार असल्याने खूपच चुरस वाढली आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने अनपेक्षिरित्या विजय मिळविल्याने या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच विधान परिषद काबीज करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतांची जुळवाजुळव केली जात आहेत. सर्वच पक्ष आता हाय अलर्टवरती आले आहेत. 

हे देखील पाहा -

राज्यसभेला शिवसेनेचे पारडं जड वाटत असतानाही संजय पवारांचा पराभव झाला होता. राज्यसभा निवडणुकीत झालेल्या चुका पुन्हा होऊ नये म्हणून पक्षाकडून खास काळजी घेतली जात आहे. महाविकास आघाडीने मतदानासाठी नवी व्ह्यूहरचना आखली असल्याची माहिती आहे. मतदानासाठी कितीचा कोटा ठेवायचा, वाढीव मतदान कोण कोणाला करायचे याविषयी आमदारांना चर्चेपासून अलिप्त ठेवण्यात येणार आहे.

विशेष बाब म्हणजे याविषयी भाजपला कुणकुण लागू नये याची महाविकास आघाडी कडून घेतली जात असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी मधील बडे नेते मतदानाच्या दिवशी आमदारांना मत कोणाला करायचे आहे याचे ऐनवेळी निर्देश देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

राज्यसभेत मतदान कोण कोणाला करणार याची आमदारांना माहिती देण्यात आली आणि ती गुप्त माहिती फुटल्याने महाविकास आघाडीला बसला होता फटका हीच बाब लक्षात घेता महाविकास आघाडीने हा प्लॅन आखला आहे.

Political News
आता पर्सनल अटॅक नको; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे निरोप

विधानपरिषदेवर निवडून येण्याचे गणित काय?

विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला एकूण 27 आमदारांच्या मतांची आवश्यकता असते. भाजपाकडे मित्रपक्षांसह मिळून एकूण 113 आमदारांचं संख्याबळ आहे. या संख्याबळानुसार भाजपाच्या 4 जागा अगदी सहज निवडून येतील. राष्ट्रवादीकडे 54 आमदार, शिवसेनेकडे 56 आमदार आणि काँग्रेसकडे 45 आमदार आहेत. या संख्याबळानुसार विधान परिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 उमेदवार निवडून येतील. काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येईल, तर दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसला भाजपाशी लढत द्यावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com