दादरमध्ये मनसेचे नवे बॅनर; राज ठाकरेंचा 'भगवा धारी' म्हणून उल्लेख

राज ठाकरे यांचा भगवी शाल पांघरलेला फोटो असून बाजूला ‘राज’ तिलक कि करो तयारी,आ रहे है भगवा धारी, असा उल्लेख करण्यात आला आहे.
दादरमध्ये मनसेचे नवे बॅनर; राज ठाकरेंचा 'भगवा धारी' म्हणून उल्लेख
दादरमध्ये मनसेचे नवे बॅनर; राज ठाकरेंचा 'भगवा धारी' म्हणून उल्लेखSaamTvNews
Published On

मुंबई : महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अलीकडेच प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा घेत मनसेच्या नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात करत प्रामुख्याने शिवसेनेसमोर आव्हान निर्माण केल्याचे बोलले जात आहे. गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक होत राज ठाकरेंनी भोंगे हटवण्याचा इशारा दिला. तसेच मशिदींवरील भोंगे हटले नाहीत तर मशिदींसमोरच लाऊडस्पीकरवर (Loudspeeker) हनुमान चालिसा लावण्याचे थेट आदेश मनसैनिकांना दिले. राज ठाकरेंचे वक्तव्य वादाचा मुद्दा बनले आणि राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीकेची झोड उठवली.

हे देखील पहा :

त्यांनतर, हनुमान जयंतीला राज ठाकरेंनी पुण्यात हनुमानाची महाआरती केली व सामूहिक हनुमान चालीसा पठण केले. १७ एप्रिलला पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी ५ जून रोजी मनसेच्या सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्या (Ayodhya) दौऱ्याची घोषणा केली. राज ठाकरे यांच्यासह राज्यभरातील मनसैनिक अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्याची मनसेकडून जय्यत तयारी केली जात आहे. मनसेच्या (MNS) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी 10 ते 12 ट्रेन बुक करण्यात येणार असून मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर या ठिकाणाहून या ट्रेन बुक केल्या जाणार असल्याची माहिती आहे.

दादरमध्ये मनसेचे नवे बॅनर; राज ठाकरेंचा 'भगवा धारी' म्हणून उल्लेख
Akola : आमदार मिटकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी!

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये (Dadar) बॅनर लावण्यात आले असून, राज ठाकरे यांचा भगवी शाल पांघरलेला फोटो असून बाजूला ‘राज’ तिलक कि करो तयारी,आ रहे है भगवा धारी, असा उल्लेख करण्यात आला आहे. दादरमध्ये झळकत असलेले हे बॅनर (Banner) चर्चेचा विषय ठरले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com