'विनाकारण शिवसेनेला...'; उदय सामंतांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया

पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे.
Neelam Gorhe
Neelam GorheSaam Tv

सचिन जाधव

पुणे - राज्यात शिवसेना (Shivsena) विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. काल पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. यावर नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील पाहा -

काल पुण्यात शिवसेनेची कात्रज याठिकाणी सभा झाली. त्या सभेच्या नंतर परतत असताना काही व्यक्तींनी माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा काच फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा दिसून येत आहे. या सगळ्या घटनेत पूर्णपणे मी स्पष्ट करू इच्छिते की, हे जे लोक आहेत ते कोण आहेत माहित नाही. नक्की ते व्यक्ती कोण होते जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ते गृहीत धरणे की हे शिवसैनिकच आहेत आणि तो हल्ला काही पूर्वनियोजित आहे की काय वगैरे अशा पद्धतीचे आरोप करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

Neelam Gorhe
२५ लाखांच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण करून हत्या; दोघांना अटक

पुढे नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आमच्या सभे मध्ये आदित्य ठाकरे यांनी जे भाषण केलं, आमची जी भाषणे झाली ते संपूर्णपणे लोकशाही चौकटीतलेच विचार मांडलेले होते. उलट ज्यांना शिवसेनाची भूमिका पटत नाही त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं असं म्हटलं होते. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं गाडी फोडण्याच्या घटनेशी या भाषणांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांच्या तपासात जे काही समोरी येईल त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com