Pune News: पुण्यात चाललंय काय? शहरात कोयता गँगचा धुमाकूळ; सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी

कोयता घेऊन दहशत माजविण्याऱ्यांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे
Supriya Sule and Devendra Fadnavis News, Pune Crime News
Supriya Sule and Devendra Fadnavis News, Pune Crime NewsSaam Tv

Supriya Sule News : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सध्या कोयता गँगची दहशत आहे. कोयता गँगच्या गुंडाच्या कृत्यामुळे पुण्यातील नागरिक आणि व्यापारी दहशतीखाली आहे. कोयता घेऊन दहशत माजविण्याऱ्यांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Supriya Sule and Devendra Fadnavis News, Pune Crime News
Eknath Shinde : शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार; लम्पी साथ रोगाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

पुण्यात गुंडाकडून हातात कोयते घेऊन दहशत माजाविण्याचा धक्कादायक घडत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रस्त्यात हातात कोयते घेऊन दहशत माजाविण्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आणि कायदा सुव्यवस्थेचा बिघडवणाऱ्या गुंडावर कारवाईची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे .

सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या की, 'पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात गेली काही दिवसांपासून काही समाजकंटक कोयता घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्वसामान्य नागरिक यामुळे भयभीत असून अशा समाजकंटकांवर अतिशय कठोर कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे'.

Supriya Sule and Devendra Fadnavis News, Pune Crime News
Jitendra Awhad : 'भीमा कोरेगावला एक तारखेला आल्यास खिमा होईल'; जितेंद्र आव्हाडांनी करनी सेनेला इशारा का दिला?

'माझी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की कृपया या समाजकंटकांचा पुरेपूर बंदोबस्त करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे.

दरम्यान, कोयता गॅंगमुळे स्थानिक नागरिक तसेच व्यापारी देखील हैराण झाले आहेत. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यातील कोयता गॅंगचा प्रश्न उपस्थितीत करत कोयता गँगवर कठोर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com