राज्यसभा निवडणुकीत मते फुटल्यानं शरद पवारांची नाराजी; प्रमुख नेत्यांना म्हणाले...

राज्यसभा निवडणुकीत मते फुटल्यावरून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Sharad Pawar Latest News Update
Sharad Pawar Latest News UpdateSAAM TV
Published On

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Elections) शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवाचे खापर अपक्ष आमदारांवर फोडलं जात असतानाच, मते फुटल्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आगामी विधान परिषद आणि राष्ट्रपतिपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांना दिल्या आहेत, असे समजते.

Sharad Pawar Latest News Update
'राज्यसभा निवडणुकीत गाफील राहून पराभव झाला, मात्र...'; एकनाथ खडसेंचे सूचक वक्तव्य

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सात उमेदवार रिंगणात होते. सहाव्या जागेसाठी प्रचंड चुरस झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पराभूत करत, भाजपचे उमेदवार धनंजय महाडीक यांनी विजय मिळवला. राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी ठरल्याचे यानंतर बोलले गेले.

दुसरीकडे, शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अपक्ष आमदारांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तर महाविकास आघाडीच्या गोटातील आमदारांचीच मते फुटल्याचे बोलले जात होते. संजय पवार यांच्या पराभवाचे खापर अपक्ष आमदारांवर फोडले जात आहे.

Sharad Pawar Latest News Update
अजित पवारांनी आमच्यासोबत यावं; भाजप नेत्याचं खळबळजनक विधान

शरद पवार काय म्हणाले?

मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. राज्यसभा निवडणुकीत मतं फुटल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाराजी बोलून दाखवली. आगामी विधान परिषद आणि राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना दिल्याचे कळते.

संजय राऊतांविरोधात पवारांकडे तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सिल्व्हर ओक येथे बैठक झाली. राज्यसभा निवडणुकीत मतं फुटल्यावरून शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आगामी निवडणुकीत काळजी घेण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या आरोपांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच या नेत्यांनी पवार यांच्याकडे नाराजी बोलून दाखवली. राऊत यांच्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण होत असल्याचीही भावना व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com