Sharad Pawar News : 'नव्या पिढीचे अर्थकारण बदलणार नाही, तोपर्यंत...' शरद पवार यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनास हजेरी दर्शवली.
Sharad Pawar News
Sharad Pawar News Saam Tv

प्राची कुलकर्णी

Sharad Pawar News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संभाजी ब्रिगेड रौप्यमहोत्सवी अधिवेशनास हजेरी दर्शवली. या कार्यक्रमात शरद पवार यांनी शेतकरी, मराठा समाज आणि आरक्षणावर भाष्य केलं.

'आरक्षणासाठी संघर्ष करायला लागला. आता आरक्षण आरक्षण बस झालं. नव्या पिढीचे अर्थकारण बदलणार नाही, तोपर्यंत अर्थकारण सुधारणार नाही, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. (Latest Marathi News)

Sharad Pawar News
Anil Deshmukh Bail | सुटकेनंतर देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार हे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्याच्या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी संभाजी ब्रिगेड रौप्यमहोत्सवी अधिवेशनास उपस्थिती दर्शवली. शरद पवार म्हणाले, 'बोलता बोलता संभाजी ब्रिगेडला २५ वर्ष झाली. संघटनेच्या वतीने कोणत्या रस्त्याने जायला हवं, याची चिकित्सा करून योग्य वेळी नेण्याची भूमिका त्यांनी घेतली. याचा मला आनंद आहे. आरक्षणासाठी संघर्ष करायला लागला. आता आरक्षण आरक्षण बस झालं, जोपर्यंत नव्या पिढीचे अर्थकारण बदलणार नाही, तोपर्यंत अर्थकारण सुधारणार नाही'.

'ही चांगली गोष्ट. आज मराठा म्हणलं की वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात. काही लोक वेगळ्या दृष्टीने चर्चा करतात. मराठा म्हणताना मराठी माणूस लढाऊ माणूस असं चित्र होतं. मराठा समाजाचे वैशिष्टय हे की, समजाची उन्नती कशी होईल असा विचार करणारा मराठा समाज आहे, असे शरद पवार म्हणाले.

'कुटुंबात दोन भाऊ, तीन भाऊ असतील तर, एकाने शेती करावी. तर इतरांनी वेगळ्या क्षेत्रात जाण्याची भूमिका घेतली पाहिजे. पंजाबमध्ये शेतकरी शेती करतो,पण एकच शेती करतो आणि बाकी दुसऱ्या देशात असेल. तो विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे, असे मत शरद पवार यांनी मांडले.

Sharad Pawar News
Maharashtra Political News : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मुंबई महापालिकेतील सेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा कब्जा

'पानिपतचा युद्धात पराभव झाला. अनेकांना माहित नसेल, पण त्या लोकांची अवस्था कशी आहे. पंजाबमध्ये तो मराठा स्थायिक झाला. आज जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झाला. अर्थकरणाकडे आपल्याला जायचे आहे. ही गोष्ट योग्य आहे, असे शरद पवार पुढे म्हणाले.

'शाहू महाराज समाजाला नवीन दिशा द्यायचे. राजकारण, जिल्हा परिषदा या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण उद्योगाकडे नवीन पिढी कशी जाईल हे पाहणं महत्वाचं आहे, असेही पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com