नवाब मलिकांचं डोकं फिरलंय, त्यांची चौकशी व्हायला हवी - अतुल भातखळकर

नवाब मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द झाला पाहिजे तसेच मलिकांची देखील चौकशी व्हायला हवी.
Nawab Malik/ Atul Bhatkhalkar
Nawab Malik/ Atul BhatkhalkarSaamTV
Published On

मुंबई : 'मला वाटत नवाब मलिक यांचे डोके फिरलं आहे. संजय राऊत यांच्या भाषेत सांगायचे तर त्यांनी उच्च किंवा कमी प्रतिचा गांजा मारलेला दिसतो'. असा टोला भाजपचे मुंबई प्रभारी व आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी नवाब मलिकांना लगावला आहे. अंमली पदार्थ Drugs कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेंडेना Sameer Wankhede ' वानखेडेंना वर्षभरात तुरुंगात टाकेन, त्यांची नोकरी घालवेन त्यांचा तुरुंगवास निश्चित असणार आहे. असा इशारा अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक Navab Malik यांनी वानखेडेंना दिला आहे. (Nawab Malik should be enquiry- Atul Bhatkhalkar)

हे देखील पहा -

त्यांच्या याच वक्तव्यावरती भाजपच्या अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे कॅबिनेटमंत्री नवाब मलिक अशी वक्तव्यं करत आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी व्हायला हवी त्यांचा जावई 8 महिने तुरुंगात होता. त्यामुळे ती चार्जशीट प्रभावित करण्यासाठी ते असे वक्तव्यं करीत असल्याचही भातखळकर म्हणाले. नवाब मलिक यांच्या जावयाचा जामीन रद्द झाला पाहिजे तसेच नवाब मलिक यांची देखील चौकशी व्हायला हवी तसेच शेवटपर्यंत जाऊन तपास यंत्रणांनी सखोल चौकशी केली पाहिजे असही ते म्हणाले

Nawab Malik/ Atul Bhatkhalkar
"समीर वानखेडे हा भाजपचा म्होरक्या, तो बोगसगिरी करतो"

मलिकांच्या जावयांवरती देखील NCB ऩे अटक केली होती आणि त्यामुळेच मलिकांचा रोष एनसीबी वरती असल्याच्या चर्चा आहेत. तसेच आपल्या जावयाकडे गांजा नव्हे तर हर्बल तंबाखु सापडली असल्याचा दावा मलिकांनी केला होता.

अनन्या पांडेची दोन तास चौकशी -

एनसीबीचा चार्च वानखेंडे यांनी घेतल्या पासून बॉलिवूड Bollywood मधील अनेक अभिनेते अभिनेत्यांची चौकशी त्यांनी केली आहे. तसेच अनेक सेलेब्रिटींना त्यांनी जेलची Jail हवा पण खायला लावलेय. मात्र या सर्वात जास्त चर्चा झालेली कारवाई म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Shah Rukh Khan's son Aryan Khan) याला झालेली अटक आणि आज अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) च्या घरी देखील एनसीबीने आज धाड टाकली दोन तासाच्या चौकशी नंतर ती एनसीबी ऑफिसमधून बाहेर पडली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com