Nawab Malik : नवाब मलिक यांना ८ दिवसांची ईडी कोठडी

मलिक यांना केवळ अडकवण्यासाठी हा सगळा माहोल तयार केला गेला आहे असा युक्तिवाद नवाब मलिक यांच्या वकिलांनी केला
नवाब मलिक यांना ८ दिवसांची ईडी कोठडी
नवाब मलिक यांना ८ दिवसांची ईडी कोठडी Saam TV
Published On

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना आर्थिक गैरव्यवहार तसेच अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे आरोप करत ईडीकडून (अंमलबजावणी संचलनालय) अटक करण्यात आली होती. आज सकाळीच ईडीचे पथक नवाब मलिक यांच्या घरी गेले होते. त्यांनतर सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन पर्यंत तब्बल सात तास मलिक यांची ईडी (ED) अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. त्यांनतर त्यांना अटक करण्यात आली. (Nawab Malik Latest News)

नवाब मलिक यांना ज्या आरोपांआधारे चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, तसेच ज्या कथित अंडरवर्ल्ड कनेक्शन (Underworld Connection) प्रकरणात त्यांना आज अटक कऱण्यात आली त्याच प्रकरणासंबंधात एनआयए आणि ईडीकडून काही दिवसांपूर्वीच मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते. तसेच भारताचा मोस्ट वॉन्टेड डॉन, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast) हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याची बहीण हसीना पारकर (Haseena Parkar) संबंधीत मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते.

ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर मलिक यांनी अगदी हसतमुखाने आणि हात उंचावत आपण पुढच्या लढाईसाठी तयार असल्याचे दाखवून दिले होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताना मलिक यांनी 'लढेंगे और जितेंगे' असे म्हटले होते. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना मलिक यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सातत्याने ट्विट करण्यात येत होते. मलिक यांना अटक झाल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले.

पीएमएलए (PMLA Court) कोर्टात या प्रकरणावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. ज्या सलीम पटेलच्या आधारावर ईडी मलिक यांच्यावर आरोप करत आहे, त्या सलीम पटेल या नावाच्या दोन व्यक्ती असून एक सलीम पटेल याचा मृत्यू झाला आहे आणि दुसरा जिवंत आहे असा युक्तिवाद मलिक यांचे वकील अमित देसाईंनी केला. ज्या पटेल नावाच्या व्यक्तीकडून नवाब मलिक यांनी जमीन विकत घेतली होती तो सलीम पटेल वेगळा असून त्याचा आणि दाऊद इब्राहिम, हसीना पारकर यांचा काही संबंध नसून मलिक यांना केवळ अडकवण्यासाठी हा सगळा माहोल तयार केला गेला आहे असा युक्तिवाद नवाब मलिक यांच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने मलीक यांना आठ दिवसांची ईडी कोठडी सुनावली असून आता ३ मार्चपर्यंत मलिक कोठडीत असणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com