'या' भाजप नेत्याचा ड्रग्स कनेक्शन, नवाब मलिक यांचा आरोप

मागील 9 महिन्यापासून माझ्या जावयाला फसवले गेले
भाजपच्या नेत्यांचा ड्रग्स कनेक्शन, नवाब मलिक यांचा आरोप
भाजपच्या नेत्यांचा ड्रग्स कनेक्शन, नवाब मलिक यांचा आरोपSaam Tv News
Published On

सुशांत सावंत

काल शहरात दोन लोकांनी पत्रकार परिषद घेत काही गोष्टी मांडल्या. अरुण हलदर माध्यमांना बोलले की, समीर वानखेडे यांनी कोणतेही धर्म परिवर्तन केलेले नाही. हलदर हे समीर वानखेडे यांच्या घरी जातात आणि क्लीन चिट देतात आणि त्यानंतर राज्यमंत्री रामदास आठवले हे स्वतः पत्रकार परिषद घेतात. ज्याने घोटाळे करून सर्टिफिकेट घेतले त्याचे समर्थन हे मंत्री करतात ही दुर्दैवी बाब आहे असे नवाब मलीक म्हणाले.

अरुण हलदर हे एका पदावर आहेत. खोटी कागदपत्रे तपासण्याचा अधिकार मागासवर्गीय आयोगाला नाही. खोट्या कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी एक कमिटी असते आणि मागासवर्गीय आयोगाला हे अधिकार नाहीत. अरुण हलदर यांचे हे वागणे संशयास्पद आहे. वैधानिक पदावर बसलेली व्यक्ती हे वागू शकते का? याबाबत आम्ही राष्ट्रपतींना तक्रार करणार आहोत. तसेच केंद्रीय राज्यमंत्र्यांची देखील तक्रार करणार आहे. तर ते असे का वागले याबद्दल देखील आम्ही विचारणार आहोत. जी व्यक्ती दलीत नाही त्याला पुढे करून तुम्ही घाबरवत आहात का?असा सवाल नवाब मलीक यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

हे देखील पहा -

पुढे ते म्हणले की, मी वानखेडे यांच्या दुसऱ्या पत्नीचे कधीच नाव घेतले नाही. मी त्यांच्या दोन्ही मुलींबाबत देखील कधी बोललो नाही. समीर वानखेडे यांच्या खोट्या कागदपत्राची तक्रार आम्ही कमिटीसमोर करणार आहोत. मागील 9 महिन्यापासून माझ्या जावयाला फसवले गेले. त्याला साडे आठ महिने तुरुंगात ठेवले. भाजपचे असे काही नेते आहेत जे ड्रगशी जोडलेले आहेत. जयदीप राणा ही एक व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती सध्या जेलमध्ये आहे. जयदीप राणाचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संबंध आहेत असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने एक गाणं बनवले होते. त्यात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही अभिनय केला होता. त्या गाण्याचे दिग्दर्शक सचिन गुप्ता होते. गायक सोनू निगम आणि अमृता फडणवीस हे होते. मात्र या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते.देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणा यांचे संबंध आधीपासूनच आहेत असे देखील ते यावेळी म्हणाले.

भाजपच्या नेत्यांचा ड्रग्स कनेक्शन, नवाब मलिक यांचा आरोप
राष्ट्रवादीचे चौदा नगरसेवक सहा वर्षासाठी निलंबित

पुढे मलिक म्हणले की, देवेंद्र फडणवीस हे नीरज गुंडे याच्या घरी बसायचे आणि तिथूनच सर्व सूत्रे हलत होते. देवेंद्र फडणवीस यांचा हाच वाझे तेवग सक्रिय होता. नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सतत त्यांच्या कार्यालयात आणि मंत्रालयात असायचा. राज्यात सर्व ड्रग्स देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्याने सुरू आहेत.ड्रग्सच्या खेळाचा मास्टरमाइंड राज्याचे माजी मुख्यमंत्री असल्याचा संशय येतो. राज्यात ड्रग्सचा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने चालत होता. देवेंद्र फडणवीस यांचा ड्रग्सशी काय संबंध आहे? असा गंभीर आरोप मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com